एका ध्येयवेड्यान बनवली सीड बँक, राज्यभर बियाणांच मोफत वाटप

शिवशंकर चापुले हा 12वी पास मात्र त्याला बालपणापासून झाडांच्या निरीक्षणची आवड लागली. त्यातूनच त्याला विविध झाडाच्या बिया गोळा करण्याचा छंद लागला.
Seed Bank
Seed BankSaam Tv
Published On

लातूर - आज पर्यावरणाच्या समस्या वाढ होत आहे याबाबत पर्यावरण दिनीच जागरूकता व संवेदना जाग्या होतात पण लातूर (Latur) जिल्ह्यातील रेणापूर येथील शिवशंकर चापुले या तरुणानं वाणाची सीड बँक तयार केली आहे. आज त्याच्या जवळ 75 देशी वाणाची बियाणे असून राज्यभर वृक्षप्रेमिना मोफत वाटत आहेत. शिवशंकर चापुले हा 12वी पास मात्र त्याला बालपणापासून झाडांच्या निरीक्षणची आवड लागली. त्यातूनच त्याला विविध झाडाच्या बिया गोळा करण्याचा छंद लागला. (Latur Latest News)

हे देखील पहा -

पर्यावरण प्रेमी शिक्षक मिलींद गिरीधारी व पोलीस अधिकारी धनंजय गुट्टे याच्या प्रोत्साहन मिळाल्याने त्याला देशी झाडाच्या बियांची बँक करण्याचे प्रोत्साहन मिळाले. पाहता पाहता त्याने 75 प्रकारच्या देशी वाणाच्या बियाणांची बँक तयार केली.

शिवशंकर चापुले यांनी या देशी वाणाच्या झाडाची लागवड वाढावी यासाठी फेसबुकवर माहिती पोस्ट करत सीड बँक तयार केली. अनेकजण व्यक्तिगत पातळीवर व संस्थात्मक पातळीवर झाडे लावण्याचे कार्य अनेक ठिकाणी सुरू आहे. पण काही ठिकाणी विदेशी वाणाच्या गुलमोहर रेनट्री, काशीद अश्या झाडे लावली जातात यांचा पर्यावरणाला कसलाही फायदा होत नाही.

Seed Bank
ED raids in Mumbai: ईडीकडून छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रूटची 9 तास चौकशी

त्याऐवजी स्थानिक देशी वाणांची झाडे लावली जावीत. या झाडाचा फायदा जैवविविधता यासाठी व्हावा या हेतूने रेणापूर येथील निसर्ग मित्र शिवशंकर चापुले यांनी परिसरात फिरून निर्मल पंधरा पांगारा शमी मास रोहिणी या विविध देशी झाडाच्या दुर्मिळ होत असलेले औषधी वनस्पती च्या बिया जमा केल्या व फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून मोफत वाटप केल्या.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com