...तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी चुल्लूभर पाण्यात जीव द्यावा : अमाेल मिटकरी

आमदार अमाेल मिटकरी हे आज अकाेलाे जिल्हा दाै-यावर हाेते.
Amol Mitkari
Amol Mitkari Saam Tv

अकोला : राज्यात शिंदे (eknath shinde) सरकार अस्तित्वात आले तेव्हापासून 89 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांना दिल्लीला, गुवाहाटीला जायला पैसे आहेत मात्र शेतकऱ्यांना (farmers) देण्यासाठी या सरकारजवळ पैसे नाही असा आरोप आमदार मिटकरी (amol mitkari) यांनी केला. (amol mitkari latest marathi news)

या राज्यात शेतकरी आत्महत्या हाेणार नाही असं फडणवीस यांनी म्हटलं हाेते. सध्या अतिवृष्टीमुळे अकाेला जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. राज्यात कृषीमंत्री, जिल्ह्यात पालकमंत्री नाहीत. दूसरीकडे शेतीचे पंचनामे केले जात नाहीत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

Amol Mitkari
'जसं श्रीलंकेत झालं तसं महाराष्ट्रातील नेत्यांना जनता रस्त्यावर फिरु देणार नाही'

शेतकऱ्यांना तात्काळ भरीव मदत द्यावी अन्यथा हे होत नसेल तर हिंदीत एक म्हण आहे चुल्लूभर पाण्यात जीव द्या तसं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावं असेही अमाेल मिटकरी यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Amol Mitkari
मुंबई गोवा महामार्गावर वन विभागाची माेठी कारवाई; दाेन ट्रकसह एक काेटीचा माल पकडला
Amol Mitkari
विटा पोलिसांची दमदार कामगिरी, ५ घरफोड्या उघडकीस; सातारा, सांगलीतील युवक अटकेत
Amol Mitkari
Neeraj Chopra : राष्ट्रकुल स्पर्धा खेळणार नाही ! नीरज चाेप्रानं केलं जाहीर; जाणून घ्या कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com