Soabean Price : सोयाबीनची ४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटलने खरेदी; लासलगाव येथे एनसीसीएफ संस्थेमार्फत खरेदी

Nashik News : खरीप हंगामात लागवड केलेला बहुतांश सोयाबीनची काढणी पूर्ण झाली आहे. यामुळे शेतकरी हा सोयाबीन विक्रीसाठी मार्केटमध्ये आणत आहे.
Soabean Price
Soabean PriceSaam tv
Published On

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : सोयाबीनच्या दरात मागील काही दिवसात घसरण झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. दरम्यान केंद्र सरकारच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाशिकच्या लासलगाव येथे एनसीसीएफ या संस्थेअंतर्गत लासलगाव विभाग सहकारी खरेदी विक्री संघामार्फत सोयाबीन खरेदी केंद्राचे शुभारंभ करण्यात आला आहे. यामुळे शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी आणू लागला आहे. 

खरीप हंगामात लागवड केलेला बहुतांश सोयाबीनची काढणी पूर्ण झाली आहे. यामुळे शेतकरी हा सोयाबीन विक्रीसाठी मार्केटमध्ये आणत आहे. दरम्यान सुरवातीला चांगला भाव मिळाल्यानंतर दारात काहीशी (Soyabean Price) घसरण झाली आहे. तर काही ठिकाणी हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केली जात असल्याने शेतकरी सोयाबीन घरात भरून ठेवत आहे. मात्र काही शेतकरी (Farmer) अडचणीमुळे मिळेल त्या भावात विक्री करत आहेत. 

Soabean Price
Nagpur News : ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची मतमोजणीसाठी काँग्रेसच्या उमेदवाराने भरले तीन लाख रुपये; प्रशासनावरही केला गंभीर आरोप

लासलगाव येथे सोयाबीन खरेदीला सुरुवात करण्यात आली असून ४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल या प्रमाणे सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे. यामुळे शेतकरी येथे सोयाबीन विक्रीसाठी आणू लागला आहे. सरकारच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत एनसीसीएफ या संस्थेअंतर्गत हि खरेदी केली जात आहे. 

Soabean Price
Maval News : अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी ८०० फुटावरून झळकावला बॅनर; मावळातील तरुणांचे अनोखे साहस

शेतकऱ्यांना नोंदणी आवश्यक 

शेतकऱ्याने अगोदर सोयाबीन नोंदणी करावी. तसेच प्रतवारी करून १२ आद्रतेच्याखाली सोयाबीन आणावी. प्रति शेतकरी एक हेक्‍टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्याची साडेतेरा क्विंटलपर्यंत सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे. यामुळे शेतकरी देखील सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com