sugarcane factory
sugarcane factory

शेतकरी, कारखानदारांमध्‍ये संघर्ष होण्याची शक्यता; ऊस दर अडीच हजार करण्याची मागणी

शेतकरी, कारखानदारांमध्‍ये संघर्ष होण्याची शक्यता; ऊस दर अडीच हजार करण्याची मागणी
Published on

नंदुरबार : जिल्ह्यातील साखर कारखाने आणि खांडसरी यांचा गाळप हंगामाला सुरवात झाली आहे. कारखान्यांनी ऊसाला कमी दर दिल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात तीन साखर कारखाने आणि खांडसारी असून त्यांच्याकडून ऊस तोडणी सुरू झाली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मशागतीच्या व खतांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्याने साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना योग्य तो दर द्यावा; अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे. (nandurbar-news-manufacturers-farmers-and-Demand-for-sugarcane-rate)

sugarcane factory
भाजप– शिवसेना समोरासमोर; महासभेत व्‍यासपीठावर उपमहापौरांच्‍या बसण्यावरून वादंग

सातपुडा साखर कारखान्याने २ हजार २६१ तर अयान कारखान्याने २ हजार ३५० चा दर दिला आहे. मात्र आदिवासी साखर कारखाना डोकरे यांनी सर्वाधिक २ हजार ५०० दर जाहीर केला आहे. खांडसरी उद्योगांकडून २ हजार २०० दर जाहीर झाला आहे. मात्र आदिवासी कारखाना सोडून इतर कारखान्यांनी दर कमी दिल्याने जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. खतांच्या वाढलेल्या किंमती त्याचसोबत शेतकऱ्यांच्या मशागतीचा खर्च वाढल्याने शेतकऱ्यांनी सर्वच कारखान्यांनी २ हजार ५०० रुपयाचा दर जाहीर करावा अशी मागणी केली आहे.

संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन

त्याच सोबत शेतकऱ्यांनी आपली कैफियत जिल्हा प्रशासनाकडे व्यक्त केल्यानंतर यातून मार्ग काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहे. कारखानदारांनी आपली मागणी मान्य न केल्यास शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. शेतकरी आणि कारखानदार यांच्यात ऊसदरावरून जिल्ह्यात संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com