Rajesh Padvi
Rajesh Padvi

५० टक्के वीज बिल भरून शेतकऱ्यांचे कनेक्शन सुरू करावे; आमदार पाडवींची मागणी

५० टक्के वीज बिल भरून शेतकऱ्यांचे कनेक्शन सुरू करावे; आमदार पाडवींची मागणी
Published on

तळोदा (नंदुरबार) : कोरोना व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. तरी वीज वितरण कंपनीकडून वीज कनेक्शन कट केले जात आहे. त्यामुळे ५० टक्के वीज बिल भरून शेतकऱ्यांचे कनेक्शन सुरू करावे; अशी मागणी आमदार राजेश पाडवी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. (nandurbar-news-Farmer-connection-should-be-started-by-paying-50-percentage-electricity-bill-Demand-of-MLA-Padvi)

जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, की कोरोना महामारी, अतिवृष्टी, ओला दुष्काळ, वादळ, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मात्र या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करीत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे. वसुली मोहीम राबविण्यात येत असल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येवून ठेपली आहे.

Rajesh Padvi
घरगुती गॅसचा गैरवापर; दोघे पोलिसांच्‍या ताब्‍यात

शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्‍यास..

वीज कनेक्शन खंडित केल्यामुळे पिकांचे नुकसान होवून जर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली; तर त्याला सर्वस्वी विद्युत वितरण कंपनी कारणीभूत राहील. त्याकरिता भाजप तीव्र स्वरूपाचे आंदोलन करील. एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता ५० टक्‍के रक्कम शेतकरी भरावयास तयार असून तेवढी रक्कम भरून उर्वरित रक्कम नंतर हप्त्याने भरावयास तयार आहेत. त्यामुळे आपल्या माध्यमातून ५० टक्के रक्कम भरून वीज पुरवठा पूर्ववत सुरू ठेवण्याचे आदेश महावितरण कंपनीला देण्यात यावेत; अशी विनंती आमदार राजेश पाडवी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com