Nandurbar News: ३६५ एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरी लागवड; बाजारपेठ, प्रक्रिया उद्योग नसल्याने उत्पादक शेतकऱ्यांपुढे समस्या

३६५ एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरी लागवड; बाजारपेठ, प्रक्रिया उद्योग नसल्याने उत्पादक शेतकऱ्यांपुढे समस्या
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी पोषक वातावरण आहे. यामुळे जिल्ह्यातील अक्कलकुवा (Akkalkuwa) तालुक्यातील ३६५ एकर क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर शेतकऱ्यांनी (Farmer) स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. (Tajya Batmya)

Nandurbar News
Local Train: लोकलमध्ये चोरीचा संशय; दोन तरुणांना अर्धनग्न करीत चोप, व्हिडियो झाला व्हायरल

सातपुड्यातील वातावरण स्ट्रॉबेरीसाठी चांगले असून यातून आदिवासी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होत असतो. मात्र प्रक्रिया उद्योग नसल्याने आणि बाजारपेठही नसल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी येत आहेत. सातपुड्याची रसाळ स्ट्रॉबेरीला राज्य शासनाने मदतीचा हात देऊन मोठ्या शहरात बाजारपेठ आणि प्रक्रिया उद्योगासाठी मोठ्या कंपन्यांना नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात प्रोत्साहन द्यावे. जेणेकरून आदिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने यासाठी पुढाकार घ्यावा; अशी मागणी अक्कलकुवा दर्गा तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

ग्रामीण भागात करावी लागतेच विक्री

स्ट्रॉबेरीचे उत्पादन चांगले येऊ लागले आहे. मात्र स्ट्रॉबेरीसाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने जिल्ह्यात स्ट्रॉबेरी प्रक्रिया उद्योगही नसल्याने शेतकऱ्यांना उत्पादित स्ट्रॉबेरी विक्रीसाठी रस्त्याच्या कडेला आणि ग्रामीण भागात घरोघरी जाऊन स्ट्रॉबेरी विक्री करावी लागत असल्याची स्थिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com