Nanded : नियमबाह्य कारभार भोवला; नांदेड जिल्ह्यात २८ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई

Nanded News : खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभाग अलर्ट मोडवर असून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये. कृषी केंद्रांमध्ये कोणत्याही प्रकरणी अनियमितता होऊ नये. यासाठी कृषी विभागाकडून तपासणी मोहीम राबविण्यात येते
Nanded News
Nanded NewsSaam tv
Published On

संजय सूर्यवंशी 
नांदेड
: खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत कृषी सेवा केंद्रामध्ये नियमबाह्य कारभार करणाऱ्या तसेच तपासणीमध्ये काही त्रुटी आढळून आल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील अशा दोषी ठरलेल्या २८ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे.

खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभाग अलर्ट मोडवर आलेला असतो. अर्थात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये. तसेच कृषी केंद्रांमध्ये कोणत्याही प्रकरणी अनियमितता होऊ नये. यासाठी कृषी विभागाकडून तपासणी मोहीम राबविण्यात येत असते. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात देखील कृषी विभागाने मोहीम राबवत प्रत्येत कृषी केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे. यामुळे काही केंद्रांवर अनियमितता आढळून आली आहे. 

Nanded News
Shahapur : मित्रांसोबत फिरायला गेला तो परतलाच नाही; भारंगी नदीत बुडून युवकाचा मृत्यू

१२ कृषी केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द 

कृषी विभागाच्या तपासणी मोहिमेत जिल्ह्यातील साधारण २८ कृषी केंद्रांवर अनियमितता आढळून आली आहे. यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. यात १२ बियाणे, खत, कीटकनाशक विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. तर १६ बियाणे विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे कृषी केंद्रांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. 

Nanded News
Amravati Accident : पेट्रोलने भरलेल्या ट्रॅकरने महिलेला चिरडले; महिलेचा जागीच मृत्यू

मोहीम अजूनही राहणार सुरु 

दरम्यान खरीप हंगामात शेतकऱ्यांना योग्य वेळी आणि नियमानुसार सेवा मिळाव्यात; यासाठी ही मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. अशाच प्रकारची नियमित तपासणी सुरु राहणार असून, नियमभंग करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com