Nanded : केळी बागेचे नुकसान; अज्ञातांने २५० झाडे कापून फेकली

Nanded News : कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करत शेतकरी प्रपंच चलवतो. अशा संकटाचा सामना करत असतानाच नांदेडच्या एका शेतकऱ्याच्या केळीच्या बागेचे अज्ञातांनी नुकसान केल्याचा प्रकार समोर आला
Nanded News
Nanded NewsSaam tv
Published On

संजय सूर्यवंशी 
नांदेड
: निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हतबल झालेला आहे. यातून कसे तरी सावरत उत्पन्न घेत आहे. अशातच शेतात काढणीवर आलेल्या केळीच्या बागेचे एका अज्ञाताने नुकसान केल्याचा प्रकार नांदेडमध्ये समोर आला आहे. शेतातील साधारण २०० ते २५० केळीचे झाडे कापून फेकल्याने शेतकऱ्याचे यात मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करत शेतकरी आपला प्रपंच चलवतो. परंतु अशा संकटाचा सामना करत असतानाच नांदेडच्या एका शेतकऱ्याच्या केळीच्या बागेचे अज्ञातांनी नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील पारडी या गावातील देवराव वैद्य यांच्या शेतातील केळीच्या बागेतील २०० ते २५० केळीचे झाडे अज्ञातांनी कापून फेकली आहेत. 

Nanded News
Akola Heat Wave : सूर्य ओकतोय आग; राज्यभरात उष्णतेची लाट, अकोल्यातील तापमान ४४ अंशापार

काही दिवसात होणार होती काढणी 

केळीच्या बागेत कापणी केल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. कारण काही दिवसांनी ही केळी काढणीला येणारं होती. यातून शेतकऱ्याला जवळपास साडेतीन लाखांचे उत्पन्न त्यांना मिळणार होते. परंतु या प्रकारामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान या शेतकऱ्याचे झाले आहे. इतकेच नाही तर रात्री अज्ञातांनी केळी सोबतच केळीतील पाईप, ठिबक याचे देखील नुकसान केले आहे. यामुळे आर्थिक नुकसानाची झळ या शेतकऱ्याला बसली आहे. 

Nanded News
Jalna Water Shortage : जालना जिल्ह्यात १५८ गावात पाणी उपसा करण्यास बंदी; पाणीटंचाईच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पोलिसात गुन्हा दाखल 

दरम्यान शेतकरी शेतात आल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. यानंतर शेतकऱ्याने पोलिसात जात तक्रार दाखल केली आहे. यावरून अज्ञात व्यक्तीवर नांदेडच्या अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. मात्र यात शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com