नाफेडकडून हमीभावाने हरभरा खरेदी बंद; दर कमी असल्यानं शेतकऱ्यांचे नुकसान

पावसाळ्याच्या तोंडावर हरभरा उत्पादक शेतकरी धास्तावले; पावसाळ्यात हरभरा कुठं ठेवायच्या या चिंतेने खरेदी केंद्रावर गर्दी
Nashik News
Nashik NewsSaam Tv
Published On

नाशिक - गेल्या तीन वर्षांपासून पाऊस चांगला झाल्याने रब्बीतील हरभरा पिकांचे उत्पादन विक्रमी वाढ होऊ लागली आहे. या हरभऱ्याची नाफेडकडून ५ हजार २३० रुपये या हमीभावाने खरेदी सुरू होती. मात्र, मागील दोन दिवसांपासून नाफेडने राज्यातील सर्व खरेदी केंद्रे बंद केले आहेत. राज्यामध्ये चालू रब्बी हंगामात हरभऱ्याचे तब्बल २७ लाख ५६ हजार टन उत्पादन झाले.

यापैकी नाफेडने अवघा ६ लाख ८० हजार टन हरभरा खरेदी केला. उर्वरित हरभरा शेतकऱ्यांकडे पडून आहे. सध्या खुल्या बाजारात हरभऱ्याचे दर ४२०० ते ४८०० रुपये एवढे आहेत. खुल्या बाजारात हरभरा विकला तर शेतकऱ्यांना एका क्विंटलमागे सरासरी ७०० रुपयांचा तोटा सहन करावा लागेल, अशी स्थिती आहे. आठ ते दहा दिवसात पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर हरभरा कुठे ठेवायचा, ही चिंता शेतकऱ्यांना आहे, त्यामुळे मिळेल तो भाव घेऊन विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.

Nashik News
Nanded : सैन्यात निवड झालेल्या तरुणाचा गोदापात्रात बुडून मृत्यू; देशसेवेचे स्वप्न अपूर्ण

२०१८-१९ या वर्षात राज्यामध्ये हरभऱ्याचे उत्पादन १३ लाख ९७ हजार टन झाले होते. त्यात यंदा दुपटीने वाढ झाली आहे. यंदा राज्यात तब्बल २७ लाख ५६ हजार टन हरभऱ्याचे उत्पादन झाल्याचे कृषी विभागाकडे नोंदी आहेत. त्यासाठी मार्चपासून राज्यातील विविध केंद्रांवर ५ हजार २३० रुपये प्रतिक्विंटल या हमीभावाप्रमाणे नाफेडने हरभरा खरेदी सुरू केली होती. यासाठी शेतकऱ्यांकडून नोंदणी देखील करून घेतली होती.

मात्र, अचानक खरेदी बंद करण्यात आली. राज्यभरात नाफेडने दोन दिवसांपूर्वी हरभऱ्याची खरेदी बंद का केली, याचे कारण स्थानिक पातळीवर कुणीही शेतकऱ्यांना कुणीही देत नाही. मात्र, विविध शासकीय योजनांसाठी जेवढा हरभरा लागतो, तेवढाच खरेदी करण्याचे टार्गेट राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने नाफेडला दिले असल्याचं सांगितले जात आहे. या टार्गेटनुसार राज्यभरातून ६ लाख ८० हजार टन हरभरा खरेदी करून राज्यातील खरेदी खरेदी केंद्रे बंद केली आहेत. त्यामुळे खुल्या बाजारात लूट सुरू आहे.

Nashik News
Nanded : सैन्यात निवड झालेल्या तरुणाचा गोदापात्रात बुडून मृत्यू; देशसेवेचे स्वप्न अपूर्ण

क्विंटलमागे ७०० रुपयांचा तोटा नाफेडकडून ५ हजार २३० रुपये या हमीभावाने हरभऱ्याची खरेदी सुरू होती. त्यामुळे शेतकरी खुश होते. मात्र, नाफेडने ही खरेदी बंद करताच खुल्या बाजारात हरभऱ्याचे भाव कोसळले आहेत. खुल्या बाजारात सध्या सरासरी ४ हजार ५०० रुपये दराने हरभरा खरेदी केला जात आहे. यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल तब्बलल ७०० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. सध्या राज्यात २०.७६ लाख हरभरा पडून आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com