Wardha News : तणनाशकाच्या फवारणीनं तण नव्हे कपाशी पडली पिवळी; पंचनामे हाेणार

जवळपास चारशे एकर परिसरात असा प्रकार घडल्याचं शेतक-यांना दावा केला आहे.
wardha
wardha saam tv

- चेतन व्यास

Wardha : यंदा सततच्या पावसानं (rain) शेतात मोठं तण वाढलं आहे. वाढलेलं तण आणि त्यात मजुरांची कमतरता अशा स्थितीत अनेक ठिकाणी शेतक-यांनी (farmers) तणाच्या नियंत्रणाकरिता तण नाशक वापरलं. परंतु वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातल्या अल्लीपूर परिसरात शेतक-यांना तणनाशकाचा फटका बसलायं. तणनाशकानं तणाच नियंत्रण तर झाल नाही पण कपाशी पिवळी पडल्यानं नुकसानीची परिस्थिती निर्माण झाली. या परिसरात जवळपास चारशे हेक्टर कपाशीवर याचा फटका बसलाय.

अल्लीपूर इथले काही शेतकऱ्यांनी यांनी त्यांच्या शेतातील कपाशीतील तण नियंत्रणासाठी एका कंपनीचं तण नाशक फवारल. त्याकरिता आवश्यक खबरदारीही घेतली. पण दहा दिवसांनी बघितलं तर कपाशीच पिवळी पडू लागली. हा प्रकार तणनाशकान झाल्याचं श्रावण सावरकर ( शेतकरी, अल्लीपूर) यांनी नमूद केले.

wardha
भारतीय बास्केटबाॅल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अर्निका गुजर - पाटील; महाराष्ट्रात जल्लाेष

दरम्यान असाच प्रकार या कंपनीचं तणनाशक वापरलेल्या इतर शेतक-यांसोबत झाल्याचं सांगण्यात येत आहे. तण नाशकामुळं कपाशी पिवळी पडू लागल्यानं उत्पन्नात घट होण्याची किंवा उत्पन्नच न होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत शेतक-यांनी कृषी अधिका-यांकडं तक्रारी केल्या आहेत. जवळपास चारशे एकर परिसरात असा प्रकार घडल्याचं शेतक-यांना दावा केला आहे.

अल्लीपूर परिसरात तणनाशकामुळे कपाशी पिकाच्या झालेल्या नुकसानीसंदर्भात परिसरातील शेतकऱ्यांनी शिवराय विद्यार्थी संघटनेच्या नितिन सेलकर यांच्या सोबत जिल्हा कृषी अधीक्षकांकडे तक्रार केलीय. या तक्रारीनंतर कृषी विभागाने संबंधित कंपनीच्या तणनाशकाचा नमुना कृषी केंद्रातून जप्त करून अमरावती येथे तपासणी करीता पाठवला आहे. तसेच परिसरातील नागरिकांच्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश कृषी विभागाने दिले आहे असे संजय बमनोटे (जिल्हा कृषी अधिकारी) यांनी नमूद केले.

wardha
आईस्क्रीम घेण्यासाठी दुकानात गेली ४ वर्षांची चिमुकली, शाॅक लागला अन्...; दुर्दैवी घटनेनं हळहळ

यंदा सततच्या पावसानं शेतीच मोठं नुकसान झालंय. पावसासोबतच वाढलेल्या तणानं पिकांना फटका बसतोय. आता तर तण नाशकाचा प्रभाव कपाशीवर झाल्याचं शेतकरी सांगत असल्यानं अडचणीत अधिकच भर पडलीय. पंचनामे करत शेतक-यांना नुकसान भरपाई देण्याची गरज व्यक्त होते.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com