NAFED Center : सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करा; निलंगा येथे ठाकरे शिवसैनिकांचे टावरवर चढून आंदोलन

Latur News : लातूरच्या निलंगा शहरात शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकरी सोयाबीन हमीभाव विक्री पासून वंचित राहिले आहेत
Latur News
Latur NewsSaam tv
Published On

लातूर : सोयाबीनला हमीभाव मिळण्यासाठी नाफेड अंतर्गत खरेदी केंद्र सुरु करण्यात आले होते. मात्र ६ फेब्रुवारीपासून हे खरेदी केंद्र बंद झाल्याने अनेक नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांकडील सोयाबीन खरेदी बाकी राहिली आहे. यामुळे सोयाबीन खरेदी केंद्र पुन्हा सुरु करण्याची मागणी होत असून निलंगा येथे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्यात आले. तर बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबीनची उधळण करत आंदोलन करण्यात आले आहे.  

लातूर जिल्हा सोयाबीन उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे. या मागणीसाठी लातूरच्या निलंगा शहरात शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकरी सोयाबीन हमीभाव विक्री पासून वंचित राहिले आहेत. खुल्या बाजारात सोयाबीनला ३ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. तर हमीभाव केंद्रावर ४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल दर दिला जात होता. 

Latur News
Bogus Fertilizer : रासायनिक खतांचा बोगस साठा; सव्वा लाख किमतीच्या ७७ बॅग जप्त, दुकानदारावर गुन्हा दाखल

टॉवरवर चढून आंदोलन 

खरेदी केंद्राची मुदत संपल्याने अनेक शेतकऱ्यांकडे सोयाबीन विक्रीविना पडून आहे. शिवाय शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल मागे एक हजार रुपयाचा फटका बसत आहे. त्यामुळे तात्काळ सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गट शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. तसेच यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील शिवसेना आणि छावा संघटनेच्या वतीने देण्यात आला.

Latur News
Radhakrishana Vikhe Patil : उत्पन्नापेक्षा साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी नवे धोरण हवे; जलसंपदा मंत्री विखे पाटील

बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सोयाबीनची उधळण
बीड
: बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी सोयाबीनची उधळण करून लक्षवेधी आंदोलन केले आहे. नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र बंद झाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहे. नाफेडचे हमीभाव खरेदी केंद्र बंद झाल्याने २३ हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी विना राहिले आहेत. त्यामुळे याच सोयाबीनची हमीभावाने खरेदी केली जावी. या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलनकर्ते गणेश ढवळे यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांनी सोयाबीनची उधळण करून आंदोलन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com