Radhakrishana Vikhe Patil : उत्पन्नापेक्षा साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी नवे धोरण हवे; जलसंपदा मंत्री विखे पाटील

Shirdi News : सहकारी संस्थांवर अंकुश ठेवणे एवढेच ध्येय सहकारी कायद्याचे आहे. कुणी अर्ज केला की लगेच चौकशी लावली जाते. यामुळे सहकारी कायद्यात बदल करण्याची गरज असल्याचे मत विखे पाटील यांनी व्यक्त केला
Radhakrishana Vikhe Patil
Radhakrishana Vikhe PatilSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 

शिर्डी (अहिल्यानगर) : मध्य प्रदेशमध्ये धान्याच्या उत्पन्नापेक्षा साठवणूक क्षमता मोठी आहे. आपल्याकडे देखील ज्या पतसंस्थांची क्षमता आहे; त्यांना धान्याचे गोडाऊन बांधण्याची परवानगी द्या. महाराष्ट्रात दीडशे लाख टन धान्याचे उत्पादन होते. मात्र साठवण क्षमता ५० लाख टन देखील नाही. त्यासाठी सहकार मंत्र्यांनी पुढाकार घेऊन नवीन धोरण आणावे; असे मत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे.  

शिर्डी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले असून यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील देखील मंचावर उपस्थित होते. सहकारी संस्थांवर अंकुश ठेवणे एवढेच ध्येय सहकारी कायद्याचे आहे. कुणीतरी अर्ज केला की लगेच चौकशी लावली जाते. यामुळे सहकारी कायद्यात बदल करण्याची गरज असल्याचे मत देखील जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. 

Radhakrishana Vikhe Patil
Jalna Police : निलंबनाच्या कारवाईनंतर पोलीस कर्मचारी गायब; जालना पोलिसात खळबळ, मिसिंगची तक्रार दाखल

सहकार कायद्यात मूलभूत बदल करावेत 

सहकार चळवळ बदनामीची धनी झाली आहे. सहकारामुळे मोठे झालेले लोक नंतरच्या काळात खाजगी क्षेत्राचा उदोउदो करायला लागले. अशा लोकांकडून सहकार क्षेत्राची बदनामी केली जाते. केंद्र सरकारने सहकार क्षेत्रासंदर्भात चांगले निर्णय घेतले असून या क्षेत्राला देखील चांगले दिवस येतील. आता राज्य सरकारने पुढाकार घेण्याची गरज असून सहकार कायद्यात मूलभूत बदल करावेत; अशी मागणी विखे पाटलांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे.

Radhakrishana Vikhe Patil
Bogus Fertilizer : रासायनिक खतांचा बोगस साठा; सव्वा लाख किमतीच्या ७७ बॅग जप्त, दुकानदारावर गुन्हा दाखल

सहकारी संस्थांवर अंकुश ठेवणे एव्हढच ध्येय सहकारी कायद्याचे आहे. परंतु कुणीतरी अर्ज केला की लगेच चौकशी, कारवाई कर, लायसन रद्द कर एवढेच काम सहकार विभागाचे आहे का? असा सवाल उपस्थित करत कायदे पाहिजे. मात्र नुसती चौकशी करून संस्था टिकणार नाहीत असे मत देखील विखे पाटील यांनी व्यक्त केले. तर या कायद्यांमध्ये बदल होणे गरजेचे आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com