Latur Bajar Samiti : लातूरच्या बाजार समितीत सोयाबीनचा सौदा पाडला बंद; भाववाढीसाठी मनसेकडून आंदोलन

Latur News : राज्यातील जवळपास सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनसह मूग, उडीद या शेतमालाला कमी भाव मिळत आहे.
Latur Bajar Samiti
Latur Bajar SamitiSaam tv
Published On

संदीप भोसले 
लातूर
: सोयाबीनला मिळत असलेल्या कमी भावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. सोयाबीनची दर वाढ व्हावी यासाठी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आज मनसेकडून सोयाबीन शेतमालाचा सकाळी होणारा सौदा बंद पाडण्यात आला. यानंतर भाववाढीसाठी बाजार समितीमध्ये आंदोलन करण्यात आले आहे. 

राज्यातील जवळपास सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Bajar Samiti) सोयाबीनसह मूग, उडीद या शेतमालाला कमी भाव मिळत आहे. विशेष म्हणजे या धान्याला शासनाने ठरवून दिलेल्या हमी भावापेक्षा देखील कमी दराने शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जात आहे. त्यामुळे शेतमालाचा लिलाव होत असताना देखील हमीभावापेक्षा जास्त भाव द्या. या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (MNS) बाजार समितीमध्ये जात सौदा प्रक्रिया बंद पाडण्यात आली. 

Latur Bajar Samiti
Nagpur News : नागपूरमध्ये हेराफेरी! इस्रो आणि नासाचं ऑफिस उघडले, १११ विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रे दिली, ५ कोटी उकळले!

मनसेचे आंदोलन 

तसेच बाजार समितीत निघणारा पोटलीचा भाव हा अनधिकृत आहे. तर हा भाव हमीभावापेक्षाही २०० रुपये कमीने काढला जात आहे.  त्यामुळे पायली, कडते, मातेरे यामधून सुद्धा शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. हे सर्व अनधिकृत सौदे बंद व्हावे; यासाठी मनसेकडून बाजार समितीतील आजचा सौदा उधळत आंदोलन करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com