Unseasonal Rain : आंबा फळबाग धोक्यात; लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीने केशर आंब्याचे नुकसान

Latur News : मागच्या आठवड्यात लातूर जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यामध्ये ग्रामीण भागातील द्राक्ष, आंबा, आणि केळी या फळपिकांचं मोठं नुकसान झाले आहे.
Unseasonal Rain
Unseasonal RainSaam tv

संदीप भोसले 
लातूर
: मागील चार दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. या (Rain) पावसामुळे शेती पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे प्रामुख्याने बहरात असलेल्या केशर आंब्याला (Mango) याचा मोठा फटका बसला आहे. यामुळे आंबा उत्पादकांचे देखील नुकसान झाले आहे. (Breaking Marathi News)

Unseasonal Rain
Navapur News : शेतातून बिबट्या पिलाला घेऊन जाताना घटना सीसीटीव्ही कॅमेरेत कैद; वन विभागाचे रेस्क्यू

मागच्या आठवड्यात लातूर जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यामध्ये ग्रामीण भागातील द्राक्ष, आंबा, आणि केळी या फळपिकांचं मोठं नुकसान झाले आहे. या दरम्यान २० एप्रिलला सायंकाळी पुन्हा अचानक (Latur) लातूर जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. या वादळी वाऱ्याचा फटका हा शेती पिकासह फळबागेला मोठ्या प्रमाणात बसला आहे. विशेषतः लातूर जिल्ह्यात नगदी आणि आर्थिक उत्पन्न देणारी केशर आंब्याची फळशेती केली जाते. जिल्ह्यात केशर आंब्याची लागवड ही मोठा प्रमाणावर केली जाते. मात्र आता याच केशर आंब्याच्या फळबागेला वादळी वाऱ्याने आणि गारपिटीने अक्षरशः झोडपले आहे. दरम्यान निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातला (Farmer) बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Unseasonal Rain
Hina Gavit News : गोरगरिबांचे हक्काचे घरकुल काँग्रेसच्या पुढार्‍यांनी वाटून खाल्ले; हिना गावित यांची काँग्रेसवर टीका

यंदा सुरुवातीपासूनच लातूर जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यात सुरुवातीपासूनच पाणी टंचाईच्या झळा नागरिकांना आणि शेती पिकांना बसत आहेत. मात्र अशा परिस्थितीत देखील लातूर जिल्ह्यातील पोहरेगाव येथील रामभाऊ हांडगे या शेतकऱ्याने आपल्या २ एकर क्षेत्रावरील केशर आंब्याची फळबाग जगण्यासाठी टँकरने पाणी दिले आहे. हजारो रुपये खर्च करून जगवलेली आंब्याची फळबाग ऐन तोडणीच्या तोंडावर वादळी वाऱ्याने मातीमोल झाली आहे. त्यामुळे आंबा उतरवण्याच्या काळातच वादळी वारे आणि गारपीट झाल्यामुळे लातूरकरांना यंदा केशर आंब्याची चव चाखायला मिळणं अवघड झाल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com