Navapur News : शेतातून बिबट्या पिलाला घेऊन जाताना घटना सीसीटीव्ही कॅमेरेत कैद; वन विभागाचे रेस्क्यू

Nandurbar News : मका कापणी करताना आढळून आलेल्या बिबट्याच्या पिकाबाबत शेतकऱ्यांनी वन विभागाचे उपविभागीय वनाधिकारी धनंजय पवार पथकाला कळवले
Navapur News
Navapur NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदूरबार : नवापूर तालुक्यातील ढोंग शिवारातील विश्वास गावीत यांचा शेतात मक्याच्या कापनी करीत असताना बिबट्याचे (Leopard) पिलू आढळून आले होते. या पिलांवर उपचार करत एका ठिकाणी ठेवण्यात आले होते. रात्रीच्या (Nandurbar) सुमारास या पिलाला बिबट्या मादी घेऊन गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. (Breaking Marathi News)

Navapur News
Pune Corporation : उघड्यावर कचरा टाकणाऱ्या १६ हजार नागरिकांवर कारवाई; पुणे महापालिकेकडून दंड वसूल

मका कापणी करताना आढळून आलेल्या बिबट्याच्या पिकाबाबत शेतकऱ्यांनी वन विभागाचे उपविभागीय वनाधिकारी धनंजय पवार पथकाला कळवले. त्यानंतर वन विभागाच्या (Forest Department) पथकाने जागेवर जाऊन सदर पिलास ताब्यात घेऊन पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल पाटील व डॉ. अविनाश वळवी यांच्याकडून तपासणी करून घेतली. जागेवरच उन्हामुळे डीहायड्रेशन होऊ नये; म्हणून औषधोपचार करून पिलास सावलीत ठेवले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Navapur News
Jalgaon Crime News : जळगावात तरुणाची हत्या; अनैतिक संबंधातून खून झाल्याच्या अंदाज

त्यानंतर रात्री एका शेतात कॅरेटमध्ये पिलाला ठेवून दिले. वन विभागाने सीसीटीव्ही कॅमेरे लावून बिबट्याची मादी पिलाला घेऊन जाते का? याची पाळत ठेवली आणि रात्री बिबट्याची मादी येऊन कॅरेटमधील पिलाला तोंडात घालून जंगलात सुरक्षित घेऊन जाताना दिसून आली. उपविभागीय वनाधिकारी धनंजय पवार यांच्या पथकाने एका छोट्याशा वन्यप्राणाच्या पिलाचे प्राण वाचवल्याने वनविभागाचे कौतुक केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com