Bazar Samiti Election : कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा वाजला बिगूल ! 'या' तारखेस मतदान

लातूर जिल्ह्यातील ११ बाजार समित्यांची मुदत संपली असल्यामुळे त्या निवडणुकीस पात्र आहेत.
latur, bazar samiti election, voting date
latur, bazar samiti election, voting datesaam tv

Bazar Samiti Election Declared : पाच वर्षांचा कार्यकारी मंडळाचा कालावधी संपल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून प्रशासक कारभार हाकत असलेल्या राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक (election) कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील सर्व अकरा बाजार समित्यांचे बिगूल वाजले आहे. २९ जानेवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे.

दरम्यान, कार्यक्रम जाहीर झाल्यानुसार जिल्हा उपनिबंधक एस. आर. नाईकवाडी यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी व सहकार अधिकाऱ्यांना पत्र पाठवून ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांच्या संचालक मंडळाची सूची येत्या २७ सप्टेंबरपर्यंत मागविली आहे.

शेतकऱ्यांसह (farmers) सर्वसामान्यांच्या अर्थकारणाशी निगडीत असलेल्या सहकारात राजकीय पुढाऱ्यांचा वरचष्मा आहे. अगदी ग्रामपंचायत व सहकारी सोसायटीची निवडणूक म्हटले तरी राजकारण अगदी रणधुमाळीचे असते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याची घोषणा केलेल्या राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा अध्यादेश जारी होण्यापूर्वीच राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मुदत संपलेल्या व ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदत संपणाऱ्या बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. लातूर जिल्ह्यातील ११ बाजार समित्यांची मुदत संपली असल्यामुळे त्या निवडणुकीस पात्र आहेत.

latur, bazar samiti election, voting date
Udayanraje Bhosale : 'नुसत्या मिशा पिळून..., उदयनराजेंचा शिवेंद्रसिंहराजेंना चिमटा

जिल्ह्यातील सर्व ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे नव्या वर्षात सहकारात राजकीय रणधुमाळी उडणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकीकडे राजकीय पुढारी लक्ष ठेऊन आहेत. राज्यात राजकीय समिकरणे बदलली असल्यामुळे समित्यांच्या निवडणुकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com