Sweet Orange : मोसंबी उत्पादनात हाेणार घट; जालन्यातील शेतकरी चिंतेत

Jalna Agriculture News: बुर्शी दृश्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने पान पिवळी पडत असल्याचे मत मोसंबी उत्पादक तज्ञांनी व्यक्त केले आहे.
sweet orange, farmers
sweet orange, farmerssaam tv
Published On

Krushi News : मोसंबीचे अगार समजल्या जाणाऱ्या जालना (jalna) जिल्ह्यात गेल्या तीन वर्षापासून सततच्या होणाऱ्या अतिवृष्टीमुळे जमिनीतील पाण्याचा (water) प्रमाण जास्त झाल्याने व त्यांचा निचरा लवकर न झाल्याने त्याचा परिणाम आता मोसंबीच्या बागांवर होऊ लागला आहे. त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना (farmers) बसताना दिसत आहे. (Maharashtra News)

sweet orange, farmers
Pandharpur : विठ्ठल भेटीनंतर Amit Thackeray पंढरपुरात स्पष्टच बाेलले, हे समीकरण आम्ही बदलणारच !

सततच्या या पावसामुळे मोसंबीच्या झाडाच्या मुळांना विसावा न मिळल्याने झाडाच्या पानाचा रंग पिवळा पडायला सुरुवात झालीय.त्यामुळे पाण गळतीचे प्रणाम वाढल्याने त्याचा मोठा परिणाम अत्ता फळधारणा वर हाेऊ लागला आहे. त्यामुळे माेसंबीच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

sweet orange, farmers
Turmeric Price : मुहूर्ताच्या हळद सौद्यात उत्पादक शेतकऱ्याची चांदी; प्रति क्विंटलला मिळाला दणदणीत भाव

सततच्या पावसामुळे जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता निर्माण झाल्याने त्याचा ही मोठा परिणाम बागांवर हाेत आहे. बुर्शी दृश्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने पान पिवळी पडत असल्याचे मत मोसंबी उत्पादक तज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे कृषी (agricultural) विभागाने बागांची पाहणी करून योग्य उपाययोजना सुचवण्याची मागणी शेतकरी (farmer) वर्गातून केली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com