Jalgaon News: शेतकऱ्याचे केळीची खोडे कापून फेकली; २५ लाखांचे नुकसान

शेतकऱ्याचे केळीची खोडे कापून फेकली; २५ लाखांचे नुकसान
Jalgaon News Banana Crop
Jalgaon News Banana CropSaam tv

न्हावी (जळगाव) : अट्रावलच्या यावल शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतातील केळीची खोडे माथेफिरूने कापून (Jalgaon News) फेकल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे (Farmer) शेतकऱ्याचे तब्बल २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. (Tajya Batmya)

Jalgaon News Banana Crop
Beed News: ५ महिन्‍यांपासून बंद असलेला जनावरांचा आठवडे बाजार पुन्हा होणार सुरू; पशुपालकांना असेल ही अट

यावल तालुक्यात मध्यंतरी अनेक शिवारांमध्ये केळी व अन्य पिकांची नासधूस करण्याच्या विकृत घटना घडल्या होत्या. आता पुन्हा एकदा असाच प्रकार यावल शिवारात घडला आहे. अट्रावल येथील राजेंद्र प्रभाकर चौधरी यांनी यावल (Yawal) शिवारातील शेत गटनंबर ९०७ मध्ये एक हेक्टर ८६ आर. या क्षेत्रात केळीची लागवड केली आहे. राजेंद्र चौधरी यांच्यासह त्यांचे पुत्र भूषण चौधरी शेतात गेले असता, त्यांना शेतातील (Banana Crop) केळीची खोडे मोठ्या प्रमाणात कापून फेकल्याचे दिसून आले.

पोलिसात गुन्‍हा दाखल

राजेंद्र चौधरी यांच्या शेतामधील सात हजार केळीच्या खोडांची व गडांची कापून अज्ञात माथेफिरूंनी फेकल्याचे दिसून आले. याबाबत राजेंद्र प्रभाकर चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात २५ लक्ष रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे. ही माहिती मिळताच फैजपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे व पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी राजेंद्र चौधरी यांच्या शेताला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com