कर्जफेडीच्या विवंचनेत होता, तरूण शेतकऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल

तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; सतत रहायचा कर्ज फेडीच्‍या विचारात
Farmer Suicide
Farmer SuicideSaam tv

अमळनेर (जळगाव) : सडावण (ता. अमळनेर) येथील ३५ वर्षीय तरुण शेतकऱ्याने शेतात निंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली. ही घटना २४ जुलैला सकाळी घडली. या बाबत पोलिसांत (Police) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Jalgaon News Farmer Suicide)

Farmer Suicide
Dhule: सोनिया गांधींच्‍या ईडी चौकशीच्या निषेधार्थ कॉंग्रेसकडून निषेध

सडावण (ता. अमळनेर) येथील विनोद प्रभाकर पाटील (वय ३५) या तरुण शेतकऱ्याने शेतात निंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या (Farmer Suicide) केल्याची घटना उघडकीस आली. विलास बाबूराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे तपास करीत आहेत.

कर्ज फेडीचे होते टेंशन

मृत विनोद पाटील यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगी व मुलगा असा परिवार आहे. विनोद याने शेतीसाठी कर्ज घेतले होते. परंतु, शेतातून हवे तसे उत्‍पन्‍न मिळाले नाही. यामुळे कर्ज फेडीचा विचार सतत मनात होता. या कर्ज फेडीच्या नैराश्यातून विनोद पाटील यांनी आत्महत्या केली असल्याचे नातेवाइकांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com