Dhule Congress News
Dhule Congress NewsSaam tv

Dhule: सोनिया गांधींच्‍या ईडी चौकशीच्या निषेधार्थ कॉंग्रेसकडून निषेध

सोनिया गांधींच्‍या ईडी चौकशीच्या निषेधार्थ कॉंग्रेसकडून निषेध
Published on

धुळे : काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची गेल्या काही दिवसांपासून ईडीतर्फे चौकशी सुरू आहे. केंद्र सरकारच्या या ईडी धोरणाविरोधात धुळ्यात (Dhule) काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले. (Dhule News Congress Protest against ED)

Dhule Congress News
Nandurbar: दरीतून झोळी करून रुग्णांना नेणाऱ्या गावात होणार रस्ता; प्रशासनाने घेतली दखल

केंद्र सरकारच्या माध्यमातून खाण्यापिण्याच्या व जिवाणावश्यक सर्वच वस्तूंवर जीएसटी लावण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत असल्याचा आरोप करत (Congress) काँग्रेसच्यावतीने केला आहे. या संदर्भात आवाज उठवल्या गेल्यामुळे विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर केंद्र सरकारच्या माध्यमातून ईडीच्या (ED) कारवाईचा बडगा उगारण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसच्यावतीने लावण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा (Sonia Gandhi) सोनिया गांधी यांच्यावर देखील ईडीकडून चौकशीचे सत्र सुरू करण्यात आला आहे.

घोषणाबाजी करत आंदोलन

धुळ्यात काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. केंद्र सरकारच्या या ईडी धोरणाविरोधात काँग्रेसचे धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करून आपला तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com