Jalgaon: ‘लंपी’मुळे गुरांचा बाजार लॉकडाउन

‘लंपी’मुळे गुरांचा बाजार लॉकडाउन
Jalgaon News Lumpy
Jalgaon News LumpySaam tv

सावदा (जळगाव) : मानवी कोविड-१९ महामारी काळातील लॉकडाउन आपण सर्वांनी अनुभवला,.पण हीच वेळ आता गुरांवर येऊन ठेपली आहे. कारण गुरांवर आलेल्या ‘लंपी डिसीज’मुळे (Lumpy Disease) जनावरे दगावत आहेत आणि याला आळा बसण्यासाठी (Corona) आता ‘कोरोना’सारखेच नियम लागू करण्यात आले आहेत. (Jalgaon News Cattle market)

गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र जनावरांमध्ये लंपी डिसीजचा संसर्ग झपाट्याने फैलत आहे. जनावरांचा हा एक त्वचेचा आजार असून, त्याचा अतिशय वेगाने संसर्ग होत असल्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शुक्रवारीच एक परिपत्रक काढून (Raver) रावेर तालुक्यातील एका भागासाठी सतर्कतेचे निर्देश जारी केले आहेत.

Jalgaon News Lumpy
Mumbai: मुंबईतील महिला असुरक्षितच, भररस्त्यात अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती

सावदा, (Jalgaon) चिनावल, रसलपूर, विवरा आणि रोझोदा या पाच गावांपासून १० किलोमीटर इतके क्षेत्र इन्फेक्टेट झोन म्हणजेच बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या परिसरातील सर्व गुरांचे गोठे, शेड यांचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. सोबत जनावरांची खरेदी-विक्री, प्रदर्शन, जत्रा, वाहतूक आदींवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. बाधित क्षेत्रातील प्रत्येक गुराचे गोटपॉक्स या लसीच्या माध्यमातून लसीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

‘लंपी’ला आळा घालण्यासाठी सतर्कता

सावदा येथे दर रविवारी जनावरांचा बाजार भरतो. पण आता ‘लंपी डिसिज’च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या निर्देशामुळे रविवारी (ता. ७) भरणारा बाजार देखील बंद ठेवण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळात मानवांसाठी जसे लॉकडाउन लागले होते. अगदी त्याच प्रकारे ‘लंपी डिसिज’मुळे जनावरांसाठी देखील लॉकडाउन लावण्याचे निर्देश प्रशासनाने दिल्याचे दिसून येत आहे.

स्‍पेशल पाच टीम

रावेर तालुक्यातील पाच बाधित क्षेत्रांसाठी शीघ्र कृती दलाची स्थापना देखील करण्यात आलेली आहे. यात सावदा परिसरात पशुसंवर्धन खात्याचे सहाय्यक आयुक्त डॉ. संजय धांडे व सावद्याचे पशुसंवर्धन अधिकारी नीलेश राजपूत यांनी लसीकरण केले. या सोबत रविवारपासून पाच दिवसांपर्यंत स्पेशल पाच चमूंचे गठन करण्यात आले असून, यात डॉ. नीलेश राजपूत यांच्या जोडीला आसाराम बारेला व विजय चौधरी, डॉ. प्रवीण धांडे यांच्या जोडीला प्रशांत खाचणे व तडवी, डॉ. रणजीत पाटील यांच्या जोडीला तुषार पाटील, डॉ. प्रदीप काळे यांच्या जोडीला गजानन खेकाटे, रामकृष्ण बारी, तडवी तर डॉ. अभिजित डावरे यांच्या जोडीला सुधाकर शेळके, नेमाडे आणि इंगळे आदी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com