रावेर (जळगाव) : मागील काही महिन्यांपुर्वी केळीला भाव नसल्याने शेतकरी हवालदील झाला होता. मात्र आता केळीला विक्रमी भाव मिळत असून मागील दहा वर्षामधील हा सर्वाधिक भाव मिळाला आहे. बऱ्हाणपूर बाजारात केळीला २ हजार ६९५ ते २ हजार ७०० रूपये प्रतिक्विंटल भावाने केळीचा (Banana) लिलाव झाला. (jalgaon news Record prices for bananas The highest rate in ten years)
देशभरात सध्या केळीची आवक फारच (Jalgaon News) कमी झाली आहे. खानदेश व निमाड प्रांतातील केळी जेमतेम उपलब्ध आहे. गतवर्षी कुक्कूबर मोझॅक व्हायरसमुळे शेतकऱ्यांनी केळीबागा उपटून फेकल्या होत्या. त्यामुळे लागवडीत मोठी घट झाली होती. यंदा वादळामुळे रावेर (Raver) तालुक्यातील अनेक ठिकाणच्या केळीबागा जमीनदोस्त झाल्या आहेत. यामुळे केळी मालाची आवक कमी झाली आहे. याउलट मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
केळी उत्पादकांना सुखद धक्का
बऱ्हाणपूर बाजारात दोन ट्रक केळीचा लिलाव २ हजार ६९५ व २ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल दराने झाला. तर वापसी केळी मालाचा भाव १ हजार २०१ रुपये प्रतिक्विंटल पोहचला आहे. या उच्चांकी भावाने केळी उत्पादकांना सुखद धक्का बसला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.