जळगाव : जिल्ह्यात ‘ई-पीक पाहणी’ हा महत्वकांक्षी प्रकल्प गतवर्षीपासून १५ ऑगस्टला सुरू होत आहे. त्यात ई-पीक पाहणी भ्रमणध्वनी ॲपद्वारे आतापर्यंत सुमारे साडेसात लाख हेक्टरची ॲपमध्ये नोंदणी झाली. यंदा सुधारित ‘ई पीक पाहणी’ मोबाईल ॲप व्हर्जन-२ आले आहे. शेतकऱ्यांनी (Farmer) या नवीन व्हर्जनद्वारे पीक पाहणी नोंदणी, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut) यांनी दिली. (Jalgaon News Farmer E Crop Survey)
यंदाच्या खरीप हंगामात पीक पाहणीचा कार्यक्रम १ ऑगस्टपासून सुरू झाला. त्यासाठी सुधारित ई-पीक पाहणी (E Crop Survey) मोबाईल ॲप व्हर्जन-२ गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी हे सुधारित मोबाईल ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून खरीप हंगामातील पीक पाहणी विहित वेळेत पूर्ण कराव्याची आहे. मागील खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकांची नोंदणी करुन या प्रकल्पास उत्तम प्रतिसाद दिला आहे. मागील वर्षभराच्या अनुभवावरून व स्थानिक पातळीवरून आलेल्या सूचनांच्या आधारे ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये काही महत्त्वाचे बदल करून शेतकऱ्यांसाठी वापरण्यास अत्यंत सोपे व सुटसुटीत ॲप व्हर्जन-२ विकसित करण्यात आलेले आहे.
व्हर्जन-२ ॲपमध्ये सुधारणा
जिल्ह्यातील प्रत्येक गटाच्या मध्यबिंदूचे अक्षांश व रेखांश समाविष्ट करण्यात आले आहे. शेतकरी ज्यावेळी पीक पाहणी करताना पिकाचा फोटो घेतील त्यावेळेस फोटो घेण्याच्या ठिकाणापासून त्या गटाच्या मध्यबिंदूपर्यंतचे अंतर आज्ञावलीमध्ये दिसणार आहे. शेतकरी पीक पाहणीसाठी निवडलेल्या गटापासून दूर असल्यास त्यांना त्याबाबतचा संदेश मोबाईल ॲपमध्ये दर्शविण्यात येणार आहे. या सुविधांमुळे पिकाचा अचूक फोटो घेतला आहे किंवा नाही हे निर्धारित करता येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.