१६ हजार शेतकऱ्यांचे बिल कोरे; तरीही कृषीपंपाची थकबाकी साडेतीन हजार कोटी

१६ हजार शेतकऱ्यांचे बिल कोरे; तरीही कृषीपंपाची थकबाकी साडेतीन हजार कोटी
कृषीपंपाची थकबाकी
कृषीपंपाची थकबाकी
Published On

जळगाव : राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरणातून वर्षानुवर्ष थकबाकी असलेल्या कृषिपंपांचे वीजबिल कोरे केले जात आहे. थकबाकीच्या योजनेनुसार महावितरणकडून निर्लेखन तसेच विलंब आकार व व्याजातील सवलतीचे १५ हजार ९६ कोटी ६६ लाख रुपये माफ झाले आहे. त्‍यानुसार खानदेशातील शेतकरींनी देखील लाभ घेतला आहे. तरी देखील खानदेशात अद्याप ३ हजार ५१७ कोटी ६६ लाखांची थकबाकी कृषीपंपाची आहे. (jalgaon-news-Empty-bills-of-16-thousand-farmers-of agricultural-pumps-are-three-and-half-thousand-crores-pending-bill)

कृषिपंप वीजजोडणी धोरणातून कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी ६६ टक्के सूट देण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यातील १६ लाख ४१ हजार ९७० शेतकऱ्यांनी वीजबिल थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभाग नोंदविला आहे. त्यांनी ९४५ कोटी ०९ लाखांचे चालू वीजबिल तसेच सुधारित थकबाकीपोटी ७६९ कोटी ५६ लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्‍यानुसार खानदेशातील १ लाख २१ हजार ५६० शेतकऱ्यांनी वीजबिल थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभाग घेऊन १३१ कोटी ३४ लाखांचे चालू वीजबिल तसेच सुधारित थकबाकी भरली आहे.

कृषीपंपाची थकबाकी
Breaking : रुपाली ठोंबरेंचा मनसेला रामराम; पुण्यात मनसेला मोठं खिंडार !

राज्‍यात ३० हजार ४०० कोटीची थकबाकी

राज्यातील ४४ लाख ५० हजार ८२८ शेतकऱ्यांकडे सप्टेंबरपर्यंत ४५ हजार ८०४ कोटी रुपयांची मूळ थकबाकी होती. यात महावितरणने निर्लेखित केलेले १० हजार ४२० कोटी ६५ लाख आणि विलंब आकार व व्याजामधून ४ हजार ६७६ कोटी १ लाख रुपयांची सूट अशी एकूण १५ हजार ९६ कोटी ६६ लाखांची रक्कम माफ करण्यात आली आहे. सोबतच वीजबिलांच्या दुरुस्तीमधून २६६ कोटी ६७ लाख रुपयांची रक्कम समायोजित करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे आता ३० हजार ४४१ कोटी ७५ लाख रुपयांची सुधारित थकबाकी आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांनी चालू वीजबिल तसेच येत्या मार्च २०२२ पर्यंत थकबाकीची ५० टक्के रकमेचा भरणा केल्यास उर्वरित ५० टक्के म्हणजे १५ हजार ३५३ कोटी ८८ लाख रुपये माफ होणार आहेत. या संधीचा लाभ घेतल्यास राज्यातील शेतकऱ्यांना वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी एकूण ३० हजार ४५० कोटी ५६ लाख रुपयांची माफी मिळणार आहे.

तर निम्‍मे थकबाकी होणार कमी

जळगाव, धुळे नंदुरबार जिल्ह्यात ३ लाख ६४ हजार १७३ शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमधील निर्लेखन, व्याज व दंड माफी आणि बिल दुरुस्ती समायोजनेद्वारे १९०४ कोटी ७८ लाख रुपये माफ करण्यात आले आहेत. आता चालू वीजबिल तसेच सुधारित थकबाकीच्या ३ हजार ५१७ कोटी ६६ लाखांपैकी ५० टक्के रकमेचा येत्या मार्च २०२२ पर्यंत भरणा केल्यास थकबाकीचे उर्वरित ५० टक्के म्हणजे १ हजार ७५८ कोटी ८३ लाख रुपये माफ होतील.

१६ हजार शेतकऱ्यांचे वीजबिल कोरे

जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात १६ हजार ५८७ शेतकऱ्यांनी वीजबिल कोरे केले आहे. या शेतकऱ्यांकडे ८६ कोटी २२ लाखांची सुधारित थकबाकी होती. त्यांनी चालू वीजबिलांचे ११ कोटी ८ लाख रुपये तसेच ५० टक्के थकबाकी म्हणजे ४३ कोटी ११ लाख रुपयांचा भरणा केला व वीजबिल कोरे केले. या शेतकऱ्यांना थकबाकीचे उर्वरित ५० टक्के म्हणजे ४३ कोटी ११ लाख रुपयांची माफी मिळाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com