जळगाव जिल्ह्यात १४ गावांनी पूर्ण केली ई पीक पाहणी; राज्‍यात जिल्‍हा प्रथम

जळगाव जिल्ह्यात १४ गावांनी पूर्ण केली ई पीक पाहणी; राज्‍यात जिल्‍हा प्रथम
E Crop servey
E Crop servey
Published On

जळगाव : माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार, माझा पीकपेरा या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांना स्वतःचा पेरा स्वतःच्या अँड्रॉइड मोबाईलमधून भरता यावा, याकरीता राज्य शासनाने १५ ऑगस्टपासून ई पीक पाहणी प्रकल्प सुरू केला आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवाल यांनी यासाठी आवश्यक ते नियोजन केले आहे. (jalgaon-news-E-crop-survey-completed-by-14-villages-in-Jalgaon-district-and-first-in-the-state)

जिल्ह्यातील तहसिलदार यांच्या अथक प्रयत्नामुळे सहा तालुक्यातील १४ गावामध्ये १०० टक्के ई पीक पाहणीचे काम पूर्ण झाले आहे. जिल्‍ह्यात १५ ऑगस्टपासून खातेदाराने प्रत्यक्ष ई पीक पाहणी करण्यास सुरवात झाली असून तलाठी यांचे सक्रीय सहभागामुळे सुरवातीपासूनच जळगाव जिल्हा राज्यात आघाडीवर आहे.

यामुळे जिल्‍हा राज्‍यात प्रथम

२८ ऑगस्टअखेर सर्व गावांमध्ये ई पीक पाहणी ॲप पोहचले असून आतापर्यंत जिल्ह्यातील ७२ हजार ८६७ शेतकऱ्यांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे. तर ४२ हजार २८९ शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष पीक पाहणी भरली आहे. या कामगिरीमुळे जळगांव जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याचे उपजिल्हाधिकारी (महसूल) शुभांगी भारदे यांनी सांगितले. ई पिक पाहणी यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील इतर गावे देखील यापासून प्रेरणा घेऊन सहभाग नोंदवतील व ई पीक पेरा स्वतः भरतील, असा आशावाद जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केला आहे.

E Crop servey
स्टेट बँकेचा अजब फतवा.. शेकडो खाती निष्क्रिय होण्याची भिती

या गावांनी केले शंभर टक्‍के काम

जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शिंगायत, रामपूर येथील तलाठी -अजय गवते, टाकळी खु.- दिपाली महाजन, गंगापुरी- मीनाक्षी पडागळे, हिंगणे बु. - फिरोज खान, चोपडा तालुक्यातील मालापुर, सलीम तडवी, मोरचिडा- अमीन अरमान तडवी, मुळ्यवतार- अजय लोका पावरा, एरंडोल तालुक्यांतील हनुमंतखेडे, यावल तालुक्यातील चिंचोली- निखिल मिसाळ, वाघोदे- पी एन नेहते, वाघझिरा -टी सी बारेला, चाळीसगांव तालुक्यातील कोंगानगर- वैशाली केकान, विसापूर- वृषाली सोनवणे, धरणगाव तालुक्यातील निशाणे खु. बसवेश्वर मजगे यांनी विशेष परिश्रम करुन गावात शंभर टक्‍के ई पीक पाहणी पूर्ण केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com