Cotton Price: आंतरराष्ट्रीय मागणीवर ठरणार कापसाला दर

आंतरराष्ट्रीय मागणीवर ठरणार कापसाला दर
Cotton Price
Cotton PriceSaam tv

जळगाव : सध्या कापसाला आठ ते नऊ हजारांचा प्रतिक्विंटल दर आहे. मात्र जेव्हा कापसाची आवक बाजारात वाढेल; तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला (Cotton) मागणी किती आहे व उपलब्धता किती आहे. यावर कापसाचा दर अवलंबून असेल, असे कापूस अभ्यासक सांगतात. कपाशीचा दर खासगी व्यापारी सात हजारांपेक्षा कमी असल्यास (Jalgaon) यंदा ‘सीसीआय’ला कापूस खरेदी करण्याची स्थिती उद्‍भवू शकते. (Jalgaon Cotton Price)

Cotton Price
Pankaja Munde: मोदींनी ठरवलं तरीही मला संपवू शकत नाही; पंकजा मुंडे यांचे खळबळजनक वक्तव्य

शहरासह जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे १०७ टक्के पाऊस झाला. जून महिन्यात पेरण्या झालेल्या कापसाची बोंडे आता परिपक्व होऊन कापूस फुटण्याच्या मार्गावर आहे. चांगल्या (Rain) पावसाने उत्पादनही चांगले येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळण्याची आशा आहे.गेल्या वर्षी कपाशीला कापूस टंचाईमुळे अकरा ते तेरा हजारांपर्यंत दर (Cotton Price) मिळाला होता. गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचा हाती आलेला हंगाम गेला होता. जिनिंग व्यावसायिकांना कापूस न मिळाल्याने मार्च महिन्याच व्यवसाय थांबवावा लागला होता. यामुळे कोट्यवधींचे नुकसान जिनिंग व्यवसायाचे झाले होते.

बागायती कापूस काढणीला सुरवात

सध्या बागायती कापूस बाजारात आला आहे. तो कमी प्रमाणात असल्याने कापसाला कुठे अकरा हजार, कुठे सोळा हजारांचा दर मिळाला असला तरी सर्वसामान्यपणे नऊ ते दहा हजारांचा दर मिळण्याची आशा आहे. बागायती शेतीतून कापसाचे उत्पादन येणे सुरू झाले आहे. गेल्या वर्षी कापसाला मिळालेला १३ हजारांपर्यंतचा दर पाहता यंदा शेतकऱ्यांनी दहा ते पंधरा टक्के पेरा अधिक केला आहे. यामुळे कापसाचे चांगले उत्पादन येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com