Pankaja Munde: मोदींनी ठरवलं तरी मला संपवू शकत नाहीत; पंकजा मुंडेंचे खळबळजनक वक्तव्य

मोदींनी ठरवलं तरीही मला संपवू शकत नाहीत; पंकजा मुंडे यांचे खळबळजनक वक्तव्य
Pankaja Munde
Pankaja MundeSaam tv

बीड : मोदींना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. पण मला कोणी संपवू शकत नाही. जर मी तुमच्या मनात असेल तर.. असं म्हणत (Pankaja Munde) पंकजा मुंडे यांनी थेट मोदींना आव्हान दिले आहे. (Beed Pankaja Munde News)

Pankaja Munde
Gondia: 120 विद्यार्थ्यांना कोंबून नेल्याप्रकरणी 4 शिक्षकासह ट्रक चालकावर गुन्हा

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरवडानिमित्त बीड (Beed) जिल्ह्याच्या अंबाजोगाई येथे आयोजित "समाजातील बुद्धिजिवी लोकांच्या सोबत संवाद" या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांची विशेष उपस्थिती होती.

वंशवादाचे राजकारण संपवायचेय

काँग्रेस पक्षात वंशवादाचे राजकारण सुरू आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. त्याचा अर्थ असा नाही की, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी एक क्षण विचार केला आणि यामध्ये मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. मला कोणी संपवू शकत नाही, असं त्या म्हणाल्या.

मला कोणी संपवायचे झाले तर मला कोणीही संपवू शकत नाहीत. मोदीजींनी सुद्धा ठरवून मला संपवायचा प्रयत्न केला, तर ते सुद्धा मला संपवू शकत नाहीत. जर मी तुमच्या मनावर राज्य केले तर...., असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com