Gondia: 120 विद्यार्थ्यांना कोंबून नेल्याप्रकरणी 4 शिक्षकासह ट्रक चालकावर गुन्हा

120 विद्यार्थ्यांना कोंबून नेल्याप्रकरणी 4 शिक्षकासह ट्रक चालकावर गुन्हा
Gondia News
Gondia NewsSaam tv
Published On

गोंदिया : जिल्ह्याच्या मजीतपूर येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेच्या 120 विद्यार्थ्यांना (Student) टेम्पोमध्ये कोंबून त्यांची वाहतूक केली होती. याप्रकरणी चार शिक्षकासह ट्रक चालक असे 5 आरोपीवर गोंदिया (Gondia) जिल्ह्याच्या गंगाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी याच प्रकरणी मुख्याध्यापकसह सहाय्यक शिक्षकांवर निलंबनाचे कारवाई करण्यात आली आहे. (Gondia Today News)

Gondia News
Crop Insurance: पीकविम्‍यापासून शेतकरी वंचित; मनसेचे प्रतीकात्मक फाशी आंदोलन

मजीतपूर येथील आश्रम शाळेतील 120 विद्यार्थ्यांना तिरोडा येथील कोयलारी आश्रम (School) शाळेत केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी टेम्पो ट्रकने नेण्यात आले होते. क्रीडा स्पर्धा संपल्यानंतर मजीतपूर आश्रम शाळेच्या शिक्षकांनी व ट्रक चालकांनी त्या ट्रकवरून दोन्ही बाजूने ताडपत्री बांधून ट्रकच्या डाल्यात बसवून कोयलारी ते मजीतपूर शाळेत आणत होते. यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने दहा ते बारा विद्यार्थी बेशुद्ध झाले. यात अकरा विद्यार्थी यांचे प्रकृती खालवली होती.

पालकाने दिली तक्रार

सदरचा प्रकार संतापदायक असल्याने याप्रकरणी एका पालकाने गंगाझरी पोलीस (Police) स्टेशनमध्ये चार शिक्षकांसह ट्रक ड्राइवर असे 5 आरोपीविरुद्ध तक्रार दिली असून बालन न्याय बालकांची (काळजी व संरक्षण अधिनियम) 2015 कलम 108,177 मोटर वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी चौकशी अंती मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षक यांना निलंबित करण्याची कारवाई आदिवासी विकास मंत्री डॉ. गावीत यांच्याकडून करण्यात आली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com