जळगाव : अतिवृष्टीने खानदेशात कपाशीच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. यंदा कपाशीचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे कपाशीचे दरही क्विंटलला ७५०० ते ८५०० दरम्यान खासगी व्यापारी देत आहेत, असे असले तरी ‘सीसीआय’तर्फे शासनासाठी आठ लाख कापसाच्या गाठींची खरेदी करेल. यामुळे डिसेंबरच्या शेवटच्या किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ‘सीसीआय’ कापूस (Cotton) खरेदी केंद्रे सुरू करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (jalgaon-news-CCI-to-buy-eight-lakh-bales-of-cotton)
यंदा सुरवातीस चांगला पाऊस झाल्याने कपाशी उत्पादकांच्या आशा पल्लवीत होऊन चांगले उत्पादन येईल, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र अतिवृष्टीने ऐन हातातोंडाशी आलेले कपाशीचे पिके हिरावून नेली आहे. ज्यांच्याकडे कापूस हाती आला त्याचे उत्पादन कमी आहे. कपाशी उत्पादन घटल्याने यंदा ‘सीसीआय’ ची खरेदी केंद्रे सुरू झाली नाहीत. खासगी व्यापाऱ्यांनी दसरा, दिवाळीला कपाशीला साडेआठ ते नऊ हजारांचा भाव कपाशीला दिला. शासनाचा कपाशीला हमीभाव सहा हजार पन्नास असा आहे. खासगी व्यापारीच जादा दर देत असल्याने कापूस उत्पादक शासनाकडे कमी दराने कापूस कसा विकणार असा प्रश्न आहे. यामुळे शासनाने ‘सीसीआय’ चे केंद्र सुरू केलेली नाही.
तर कमी दराने कापूस विकावा लागणार
शासनाला कपाशीची गरज असल्याने खानदेशातून सुमारे आठ लाख गाठीची खरेदी सीसीआय करणार आहे. त्यासाठी डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारीत सीसीआय कापूस खरेदी करू शकते किंवा बाजारातून कापूस खरेदी करू शकते. मात्र त्यासाठीचा दर असून निश्चीत झालेला नाही. ‘सीसीआय’ने केंद्रे सुरू केले तर शेतकऱ्यांना कमी दराने कापूस विकावा लागेल, याची चिंता शेतकऱ्यांना आहे. दुसरीकडे सीसीआय कापूस खरेदी केंद्रेच सुरू करणार नसल्याचा दावा व्यापारी करीत आहेत. सध्या कपाशीची आवक बाजारात कमी आहे. यामुळे साडेसात ते साडेआठ हजारांचा भाव कपाशीला मिळतो. तो आणखी वाढेल अशी अशा शेतकऱ्यांना आहे. यामुळे शेतकरी कापूस विक्रीस आणीत नसल्याचे सांगण्यात आले.
चार लाख गाठींची निर्मिती
खानदेशात आतापर्यंत चार लाख गाठींची निर्मिती करण्यात आली आहे. एका खंडीला (दोन गाठी) ६५ ते ८५ हजारांचा दर दिला जात आहे. चांगला कापसाला दर्जाप्रमाणे दर दिला अशी आहे. अशी माहिती खानदेश जिनिंग प्रेसिंग मिल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी ‘सकाळ’ला दिली.
‘सीसीआय’चा इन्कार
‘सीसीआय’ ने कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्याचा इन्कार केला असून हमीभावापेक्षा जास्त दराने ‘सीसीआय’ कापूस खरेदी करू शकणार नाही, अशी माहिती सीसीआयचे विभागीय व्यवस्थापक अर्जुन दवे यांनी दिली. तुर्ततरी कापूस केंद्रे सुरू करण्याचा विचार नसल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.