Muktainagar News
Muktainagar NewsSaam tv

Muktainagar News : जेवणाचा डबा घेऊन शेतात गेलेल्या मुलाने वडिलांना पाहून फोडला हंबरडा; तरुण शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल

Jalgaon News : शेतीसाठी पीक कर्ज काढले असताना सततची नापिकीमुले कर्ज फेडू शकत नाही
Published on

मुक्ताईनगर (जळगाव) : शेतीसाठी कर्ज काढले असताना शेतीतून उत्पन्न मिळत नाही. यामुळे कर्जफेडीच्या विवंचनेत असलेल्या तरुण शेतकऱ्याने शेतात जाऊन विषारी द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपविली आहे. हि घटना मुक्ताईनगर तालुक्यातील रिगाव येथे घडली आहे. 

मुक्ताईनगरातील (Muktainagar) रिगाव येथील सुरेश ओंकार विटे (वय ४०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सदरची घटना २ ओक्टोम्बरला सकाळी उघडकीस आली. सुरेश विटे यांची शेती असून यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. शेतीसाठी पीक कर्ज काढले असताना सततची नापिकीमुले कर्ज फेडू शकत नाही. डोक्यावर असलेल्या कर्जामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. सुरेश विटे हे नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी साडेआठला रिगाव शिवारातील (Farmer) शेतात गेले होते. यावेळी त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केले. 

Muktainagar News
Shrirampur Congress : श्रीरामपूरमध्ये काँग्रेसच्या दोन गटांत गोंधळ; मुलाखतीदरम्यान एकमेकांविरोधात घोषणाबाजी

दरम्यान अकरा वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा गौरव त्यांचा जेवणाचा डबा घेऊन शेतात गेला. यावेळी गौरवला वडील शेतातील झोपडीजवळ बेशुद्धावस्थेत दिसले. त्याने वडिलांना बघून हंबरडा फोडला आणि धावत जाऊन घरी सांगितले. यानंतर त्यांचे मोठे बंधू गणेश विटे यांनी तत्काळ शेताकडे धाव घेऊन भावाला मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात आणले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून सुरेश विटे यांना मृत घोषित केले. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. याबाबत मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com