जनावरांच्या तोंडखुरी आणि पायखुरी आजारांचा भंडारा जिल्ह्यात शिरकाव

या आजारामध्ये जनावरांच्या तोंडात जखमा होतात त्यामुळे जणावरे चारा खाणे बंद करतत तत्काळ उपचार न झाल्यास जनावरे कमकुवत होतात.
जनावरांच्या तोंडखुरी आणि पायखुरी आजारांचा भंडारा जिल्ह्यात शिरकाव
जनावरांच्या तोंडखुरी आणि पायखुरी आजारांचा भंडारा जिल्ह्यात शिरकावअभिजीत घोरमारे
Published On

भंडारा : जनावरांच्याAnimals तोंडखुरी व पायखुरी आजारांचा भंडाराBhandara जिल्ह्यात दोन महिन्यांअगोदर शिरकाव झाले असून जिल्हात सध्या मोजक्याच जनावरांना ह्याची लागण झाली असल्याने दोन भंडारा पशुविभागDepartment of Animal कामाला लागले आहे.भंडारा जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणुन ओळखला जात असून शेतीला पूरक म्हणून जिल्ह्यातील शेतकरी पशुपालन मोठ्या प्रमाणावर करतात.Infiltration of animal mouth and foot diseases in Bhandara district

हे देखील पहा-

मागील दोन महिण्यांपासून जनावरांवर तोंडखुरी व पायखुरी रोगांचा सामाना शेतकऱ्यांना करावा लागतो. सामान्यत: ऑक्टोबर- नोहेंबर महिन्यात येणाऱ्या तोंडखुरी व पायखुरी रोग जिल्ह्यात दोन महिन्यात आला असून जिल्हात केवळ मोजक्याच जनावरांना ह्याची लागण झाली आहे. जिल्ह्यात 2 लाख 90 हजार जनावरे असून बोटावर मोजता येईल इतक्या जनावरांना यांची लागन झाली आहे. मात्र दोन महिन्या अगोदर लागन झाल्याने जिल्हा पशु संवर्धन विभाग कामाला लागले आहे. भंडारा जिल्ह्यात पुढील सप्टेंबर महिन्यात 'फुट एंड माऊथ' 'Foot and Mouth'वैक्सीनvaccine लागनार असल्याने पशुपालकांनी घाबरन्याचे कारण नसल्याचे सांगण्यात येत आहे.

जनावरांच्या तोंडखुरी आणि पायखुरी आजारांचा भंडारा जिल्ह्यात शिरकाव
भाजपने मुख्यमंत्र्यांना पाठविली, हीरक आणि अमृत महोत्सव यातील फरक दर्शविणारे 2000 पत्र!

या आजारामध्ये जनावरांच्या तोंडात जखमा होतात त्यामुळे जणावरे चारा खाणे बंद करतत तत्काळ उपचार न झाल्यास जनावरे कमकुवत होतात हा रोग तोंड व पायाचा भागाला संसर्गित करतो,यामुळे हा गुरेढोरे जसे गाय, म्हैस,शेळ्या यांच्‍यासारख्‍या खुरे असलेल्‍या जनावरांमध्‍ये संसर्ग होतो. जनावरांमध्ये सर्वांत जास्‍त संसर्गजन्‍य असलेला रोग असून या रोगाच्या उपचारासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात. एकंदरित जिल्ह्यात पायखुरी व तोंडखुरी च्या परिणाम पाहिजे तितका नसला तरी लसिकरन अभियान लवकर सुरु करने काळाची गरज ठरली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com