मुंबईत वाढले भाज्यांचे दर, गृहिणींचं कोलमडलं बजेट

सध्या महागाईचा जोर दिवसेंदिवस वाढत असताना दिसून येत आहे.
Increase in the price of vegetables, Mumbai Latest Marathi News
Increase in the price of vegetables, Mumbai Latest Marathi NewsSaam Tv

मुंबई: सध्या महागाईचा जोर दिवसेंदिवस वाढत असताना दिसून येत आहे. महागाईमुळे (Inflation) अगोदरच स्वयंपाक घरातील बजेट बिघडले असताना आता भाज्याचे (Vegetable) भाव देखील वाढले आहेत. भाज्यांच्या वाढत्या भावांमुळे मुंबईकरांचे (Mumbai) खिसे रिकामे होत असतानाचे पाहायला मिळत आहेत. एकीकडे एलपीजी (LPG) सिंलिडरचा भाव वाढत असताना आता भाज्या देखील महाग झाल्या आहेत. इंधनांच्या वाढत्या भावामुळे वाहतूक खर्चात वाढ झाल्याने भाजांचे भावही वाढताना दिसत आहेत. (Mumbai Latest Marathi News)

हे देखील पाहा-

मार्केटमध्ये लिंबू प्रत्येकी २० रुपयांना मिळत आहे. भाजी विक्रेत्याने दिलेल्या माहितीनुसार की, मिरचीचे भाव ८० ते १०० रुपयांवरून १६० ते २०० रुपये किलो झाले आहेत. तर हिरवे वाटाणे हे २०० रुपये किलो झाले आहेत. वाढता उन्हाळा आणि पेट्रोल- डिझेलचे (Petrol-diesel) वाढलेले भाव यामुळे वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. परिणामी भाज्यांच्या भावातही वाढ झाली आहे.

Increase in the price of vegetables, Mumbai Latest Marathi News
तंजावरमध्ये भीषण दुर्घटना; मंदिरात मिरवणुकीदरम्यान विजेच्या धक्क्याने 11 जणांचा मृत्यू

मुंबईत सर्व भाज्यांची सरासरी किंमत ६०-८० रुपये प्रति किलो होती. मात्र, अगोदरच्या तुलनेत हे भाव आता ८०-१२० रुपये प्रति किलो झाले आहेत. बाजारामधील किराणा व्यापारी यांनी दिलेल्या माहितीनुसार की, १० ते १५ रुपयांना विकला जाणारा लिंबू महागड्या यादीत पहिला आहे. गाजर ४० ते ६० रुपये किलोवरून ४० ते ६० रुपये किलो झाले आहेत. तर, चवळीच्या शेंगांचे भाव २०० रुपये किलो आहे. पालक आणि कोथिंबीरच्या जुड्या अगोदर १० रुपयांना विकल्या जात होत्या, त्या आता २० रुपयांना विकल्या जात आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com