Temple accident in Thanjavur
Temple accident in Thanjavur Saam Tv

तंजावरमध्ये भीषण दुर्घटना; मंदिरात मिरवणुकीदरम्यान विजेच्या धक्क्याने 11 जणांचा मृत्यू

तामिळनाडूच्या (Tamil Nadu) तंजावरमध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे.
Published on

वृत्तसंस्था: तामिळनाडूच्या (Tamil Nadu) तंजावरमध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. एका मंदिरात (temple) मिरवणुकीच्या दरम्यान करंट लागून ११ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. यामध्ये २ बालकांचा देखील समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार तंजावरमधील (Thanjavur) मंदिरात एका रथयात्रेच्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे.

हे देखील पाहा-

रथयात्रा सुरु असताना वीजेच्या तारेला स्पर्श झाल्याने ही धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या काही क्षणामध्ये होत्याचे नव्हते झाले अन् ११ भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले असल्याची देखील माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेमध्ये अनेक भाविक गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये (hospital) दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस (Police) तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्याला सुरुवात केली आहे. या मंदिरामध्ये ९४ वा अप्पर गुरु पूजा उत्सवाचा कार्यक्रम सुरु होता. या उत्सवाकरिता मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी झाली होती.

Temple accident in Thanjavur
उल्हासनगरात साडेचार वर्षीय चिमुकल्याची अपहरण करून हत्या; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

या रस्त्यावर पारंपारिक रथ यात्रेच्या वेळी एका वीजेच्या तारेला रथाचा स्पर्श झाला. यामुळे करंट उतरुन ११ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये २ लहान मुलांचा देखील समावेश आहे. या दुर्देवी घटनेमुळे तामिळनाडूबरोरबच देशभरात खळबळ उडाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com