परभणी जिल्ह्यात पावसाचा हाहा:कार !

परभणी जिल्ह्याला गेल्या दिवसांपासून पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. जिल्ह्यातील सुमारे 31 महसुल मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
परभणी जिल्ह्यात पावसाचा हाहा:कार !
परभणी जिल्ह्यात पावसाचा हाहा:कार !राजेश काटकर
Published On

परभणी : परभणी जिल्ह्याला गेल्या दिवसांपासून पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. जिल्ह्यातील सुमारे 31 महसुल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. तर जिल्ह्याभरात दोन दिवसांपूर्वी पावसाची सरासरी 70 मिमी एवढी नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक 95.5 मिमी पाऊस सिंगापूर मंडळात पडला आहे.

242 गावांना अतिवृष्टीचा फटका :

मागील 10 दिवसात 33 हजार 237 हेक्टरवरील जिरायती क्षेत्र, तर 600 हेक्टरवरील बागायती क्षेत्राचे नुकसान झाले आहे. जवळपास 90 हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले असून जून महिना ते आजपर्यंत 882 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर जुलै च्या 23 तारखेपर्यंत 84 टक्के पाऊस झाला आहे. परभणी जिल्हात गेल्या पंधरा दिवसात 882 मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यात हजारो हेक्टर खरिपाची पिके, फळबागा व भाजीपाला याचे प्रचंड नुकसान झाले. मात्र, एक आठवडा उलटून गेला आहे तरी अद्यापही पंचनामे झाले नाहीत.

हे देखील पहा -

अल्पभूधारक शेतकरी संतोष खंडागळे यांनी जून महिन्यामध्ये मृग नक्षत्रात खरिपाची पेरणी केली होती. त्यात कापूस, मूग, तूर व सोयाबीन पेरले होते. पण मागील झालेल्या मुसळधार पावसाने हि पिके वाहून गेली व काहीअति पाण्यामुळे पिवळी पडली. संतोष यांना बी बियाणे व खतांसाठी सुमारे एक लाख रुपयांचा खर्च आला असून आता पुन्हा दुबार पेरणी करावी लागते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून कोणीही नुकसान पाहणी केली नसल्याने आम्ही चिंतेत सापडला आहोत असे मत त्यांनी व्यक्त केले.

परभणी जिल्ह्यात पावसाचा हाहा:कार !
दुर्लक्षित गडदेवदरी च्या इतिहासाला मिळणार उजाळा

गेल्या आठवड्यात खरीपाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुन्हा दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसाने नुकसानात अधिक भर टाकली आहे. शेतकऱ्यांच्या शेतात गुडघाभर पाणी साचले असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता अधिक वाढल्या आहेत. तसेच फळबागा व भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीस आलेले दोडके, कारले व टोमॅटो आदी पिके पिवळी पडत असून हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. शेतकरी प्रचंड चिंतेत असून शासनाने दखल घ्यावी व तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी आता शेतकरी करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com