टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन; बाजारात टोमॅटोला विक्रमी दर
टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन; बाजारात टोमॅटोला विक्रमी दरभारत नागणे

टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन; बाजारात टोमॅटोला विक्रमी दर

अर्धा एकर टोमॅटोतून दररोज 50 हजार रुपयांचे उत्पन्न
Published on

पंढरपूर - जोरदार झालेल्या पावसानंतर भाजीपाल्याची बाजारात आवक मंदावली आहे. त्यानंतर आता भाजीपाल्यांचे दर कडाडले आहेत. मागील दोन महिन्यापूर्वी रस्त्यावर टाकून द्यावा लागलेल्या टोमॅटोला आता विक्रमी दर मिळू लागला आहे. माळशिरस तालुक्यातील चौंडेश्वरी वाडी येथील शेतकरी बाळासाहेब साखळकर यांच्या अर्धा एकर टोमॅटोतून दररोज 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. दर चांगला मिळत असल्याने अर्धा एकर टोमॅटो पासून त्यांना नऊ ते दहा लाख रुपयाचे भरघोस उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

हे देखील पहा -

मागील दोन - तीन महिन्यापूर्वी बाजारात टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. त्यावेळी त्यामुळे बाजारात टोमॅटोचे दर गडगडले होते .अशा वेळी शेतकऱ्यांना टोमॅटो रस्त्यावर टाकून देण्याची वेळ आली होती. त्यानंतर राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला. या पावसात भाजीपाल्याचं व फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर आता बाजारात भाजीपाल्याची आवक मंदावली आहे.

टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन; बाजारात टोमॅटोला विक्रमी दर
Nashik : मुल्हेरच्या मंदीरात ऐतिहासिक रासक्रिडा उत्सवाला सुरुवात!

त्यामुळे कोथिंबीर, टोमॅटो,गवार कांदा, वांगी, यासह इतर भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत. यातच आता टोमॅटोचा दर प्रति किलो 50 रुपये इतका झाला आहे. टोमॅटोला दर वाढल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. साखळकर यांना त्यांच्या टोमॅटो पिकातून दररोज पन्नास क्रेट इतके उत्पन्न मिळत आहे. बाजारात सरासरी नऊशे ते हजार रुपये एका क्रिकेटची विक्री केली जात आहे.

एक आठवड्यापासून त्यांचीही विक्री सुरू आहे. आतापर्यंत साधारण शंभर क्रिकेटची त्यांनी विक्री केली आहे. त्यांना जवळपास साडेतीन लाख रुपये मिळाले आहेत. आणखी सहा ते सात लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com