Lumpy Skin Disease: 'लम्पी' चा प्रादुर्भाव वाढला... शेतक-यांनाे! घाबरु नका, जनावरांचे लसीकरण करुन घ्या : पशुसंवर्धन विभाग

नगर जिल्ह्यात पावसाळा सुरु झाल्यानंतर जनावरांना लम्पीची लागण हाेऊ लागली आहे.
Lumpy Skin Disease, nagar news
Lumpy Skin Disease, nagar newssaam tv
Published On

- सुशील थोरात

Nagar News : लसीकरणामुळे कमी झालेला जनावरांमधील लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा नगर जिल्ह्यात वाढू लागला आहे. गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात 239 गावात 1 हजार 174 जनावरांना लम्पीची लागण झालेली आहे. त्यातील 19 जनावरे गंभीर अवस्थेत असून 53 जनावरांचा मृत्यू झाला. (Maharashtra News)

Lumpy Skin Disease, nagar news
Palghar Talasari Hospital Viral Video: पालघरला मांत्रिकाकडून ग्रामीण रुग्णालयात उपचार, व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल हाेणार?

राहुरी, शेवगाव, पाथर्डी, कोपरगाव तालुक्यात लम्पीचे प्रमाण वाढते आहे. शेतकर्‍यांनी, पशुपालकांनी गोठे स्वच्छ ठेवून कीटकनाशकांची फवारणी करावी, पशुसंवर्धन विभागाने प्रतिबंधक उपाययोजना म्हणून लसीकरणाची मोहीम सुरू केल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे यांनी दिली.

Lumpy Skin Disease, nagar news
Jaysingpur Crime News : फिल्मी स्टाइल अपहरणाने काेल्हापुरात 'सत्या'ची चर्चा, ज्वेलर्सच्या मालकसह पुतण्याचा शाेध सुरु

गेल्या मे 2023 मध्ये जिल्ह्यात केवळ 4 जनावरांना लागण झालेली आढळली होती. पावसाळा सुरू झाला तसा 15 जूननंतर लम्पीचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला. पावसाळ्यात कीटक, चिलटे, डास माशांचे प्रमाण वाढू लागले तसे जनावरांतील लम्पीचा आजार बळावत चालला आहे

नगर जिल्ह्यात 239 गावात लम्पीचा प्रादुर्भाव असून सर्वाधिक रुग्णसंख्या शेवगाव 279, राहुरी 269,कोपरगाव 183,पाथर्डीत 134 येथे आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com