बीड : बीड जिल्ह्यात Beed District मुसळधार पावसाने Heavy Rain सर्वात जास्त फटका वडवणी तालुक्यातील Wadwani Taluka शेती आणि शेतकऱ्यांना Farmers बसला आहे. या शेतकऱ्याला पंचनामा न करता सरसकट, हेक्टरी 50 हजार रुपये तात्काळ मदत करा. या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या BJP वतीने वडवणी तहसील कार्यालयावर Wadwani Tehsil Office भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करत मदत द्या, शेतकऱ्यांना मदत द्या अशा घोषणा देण्यात आल्या. (Farmers' march demanding declaration of wet drought)
हे देखील पहा -
बीड जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद वडवणी तालुक्यात झाली असून इथल्या शेतीचं 100% नुकसान झाला आहे. डोंगर भागातील शेतीसह माती जनावरे देखील वाहून गेले आहेत. स्त्याचे नुकसान झाले आहे. मात्र अद्याप प्रशासन काहीच उपाययोजना करत नसल्याने संतप्त झालेल्या, भाजपसह शेतकऱ्यांनी हा मोर्चा काढला. शेतकऱ्याचे अद्याप पंचनामे देखील झाले नाहीत, परिस्थिती खूप वाईट आहे. त्यामुळे सरकारने हलगर्जीपणा न करता तात्काळ मदत करावी. या मागणीसाठी आज वडवणी तहसील कार्यालयावर बाबरी मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा संपन्न झाला.
वडवणी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघालेला मोर्चा थेट तहसील कार्यलयावर धडकला. तहसीलदार यांना निवेदन देत लवकरात लवकर नुकसान भरपाई द्या. अन्यथा यापेक्षा तीव्र मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढू. असा इशारा भारतीय जनता पार्टीच्या BJP वतीने देण्यात आला आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.