जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीनच्या प्रेमात; १ हजार ६५६ हेक्टर क्षेत्रावर बेमोसमी पेरा!

शेतकऱ्यांनी बेमोसमी सोयाबीन पेरणीला पसंती दिली आहे.
जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीनच्या प्रेमात; १ हजार ६५६ हेक्टर क्षेत्रावर बेमोसमी पेरा!
जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीनच्या प्रेमात; १ हजार ६५६ हेक्टर क्षेत्रावर बेमोसमी पेरा!दीपक क्षीरसागर
Published On

लातूर: लातूर जिल्ह्यात (district) सोयाबीन (Soybean) प्रमुख पीक असून, खरिपात सर्वाधिक ४ लाख २० हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा असती. मात्र, यावर्षी झालेल्या पावसामुळे (rain) उत्पादनात घट झाली आहे. परिणामी, शेतकरी (Farmers) बेमोसमी सोयाबीनकडे वळाले असून, जिल्ह्यात १६५६ हेक्टर्सवर पेरणी करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

यंदा समाधानकारक पाऊस झाला असल्याने जलस्रोतांना मुबलक प्रमाणात पाणी आहे. यामुळे शेतकऱ्यांनी बेमोसमी सोयाबीन पेरणीला पसंती दिली आहे. लातूर (Latur) २८५ हेक्टर, उदगीर ११८, अहमदपूर १७२ जळकोट ५१०, देवणी ४२, शिरूर अनंतपाळ १५०, औसा ३०८ निलंगा (Nilanga) ३४०, रेणापूर १९ तर चाकूर तालुक्यात ५८ हेक्टरवर बेमोसमी सोयाबीनचा पेरा झाला आहे. सध्या सोयाबीनचा भाव ६ हजारांवर स्थिर असून, शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा आहे.

जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीनच्या प्रेमात; १ हजार ६५६ हेक्टर क्षेत्रावर बेमोसमी पेरा!
जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश; 24 तासात 5 दहशतवादी ठार

दरम्यान, जिल्ह्यात १६५६ हेक्टरवर बेमोसमी सोयाबीनचा पेरा झाला असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. दरम्यान, १५ डिसेंबरनंतर पेरणी केलेल्या सोयाबीनला उन्हाचा तडाखा शक्यता कृषी विभागाने व्यक्त केले आहे. त्यामुळे सोयाबीवर योग्य त्या फवारणी करण्याची गरज आहे. मागच्या वर्षी सोयाबीनचा भाव २१ हजारांवर पोहोचला होता.

यंदा अटीमुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे बेमोसमी सोयाबीन पेरले आहे. चांगले उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. पहिल्यांदाच हा प्रयोग करत आहेत. सोयाबीनला सध्या ६ हजारांचा भाव आहे. खरिपात हाती काहीच आले नाही. त्यामुळे आता थोडेफार तरी उत्पन्न मिळेल म्हणून सोयाबीनची पेरणी केली आहे. पाणी असल्यामुळे बेमोसमी सोयाबीन चांगले उत्पादन देईल.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com