जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश; 24 तासात 5 दहशतवादी ठार

गेल्या १२ तासांत सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या ५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला
Jammu and Kashmir: सुरक्षा दलाला मोठं यश; 24 तासात 5 दहशतवादी ठार
Jammu and Kashmir: सुरक्षा दलाला मोठं यश; 24 तासात 5 दहशतवादी ठारSaam Tv
Published On

वृत्तसंस्था: जम्मू- काश्मीरमधून (Jammu and Kashmir) एक म्हत्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या १२ तासांत सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबा (Lashkar-e-Taiba) आणि जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) या दहशतवादी (Terrorist) संघटनेच्या ५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा कमांडर जाहिद वानी (Zahid Wani) आणि एका पाकिस्तानी (Pakistan) दहशतवाद्याचा समावेश आहे. (Big success security forces Jammu Kashmir)

हे देखील पहा-

काश्मीरच्या (Jammu and Kashmir) आयजीपींनी सुरक्षा दलांकरिता हे मोठे यश असल्याचे सांगितले आहे. जम्मू आणि काश्मीर डीजीपी यांनी दिलेल्या माहितीनुसार की, शनिवारी रात्री बडगाम (Budgam) जिल्ह्यात (district) चरारेश्रीफ आणि पुलवामा (Pulwama) जिल्ह्यामधील नायरा येथे सुरक्षा दलांनी मोठी ही कारवाई केली आहे. यादरम्यान बडगाममध्ये एक आणि पुलवामामध्ये ४ दहशतवादी मारले आहेत. जाहिद मंजूर वानी हा जम्मू- काश्मीरमधील जैशच्या प्रमुख केडरपैकी एक होता. १४ फेब्रुवारी २०१९ दिवशी ज्या लेटपुरा घटनेमध्ये ४० पेक्षा अधिक CRPF जवान शहीद झाले होते. त्यात जाहिदचा सहभाग होता.

जम्मू- काश्मीरमध्ये शनिवारी संध्याकाळी परत एकदा दहशतवाद्यांनी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. कुलगाम जिल्ह्यामध्ये एका पोलिसाच्या हत्येनंतर पुलवामाच्या नायरा भागात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार करण्यात आला होता. मोठ्या संख्येने लष्कर, पोलीस आणि सीआरपीएफच्या पथकांनी घटनास्थळाचा ताबा घेतला होता.

Jammu and Kashmir: सुरक्षा दलाला मोठं यश; 24 तासात 5 दहशतवादी ठार
Mumbai: ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतींचा धुरळा, शर्यतीसाठी हजारोची गर्दी...

दुसरीकडे शनिवारी सायंकाळी कुलगाम जिल्ह्यात हसनपोरा येथे संशयित दहशतवाद्यांनी हेड कॉन्स्टेबल अली मोहम्मद गनी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ते हेड कॉन्स्टेबल कुलगाम पोलीस ठाण्यात तैनात होते. पोलीस कर्मचाऱ्याला गोळी झाडल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घालण्यात आला होता.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com