Breaking - शेतकऱ्यांना जुन्या दरानेच खतं देण्याचा मोदींचा निर्णय

Narendra Modi
Narendra Modi
Published On

मुंबई : आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Narendra Modi खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना Farmers एक मोठा दिलासा दिलाय. रासायनिक खतांच्या किमतीत वाढ न करता ती शेतकऱ्यांना जुन्याच दरात मिळावी असे निर्देश दिलेत. Farmers to get fertilizers by old rates decided by Narendra Modi

त्याचबरोबर ज्या खतांची भाववाढ अटळ आहे त्या खतांच्या अनुदानात Subsidy सरकारनं मोठी वाढ करत शेतकऱ्यांना दिलासा दिलाय. यामध्ये सर्वाधिक वकल्या जाणाऱ्या डीएपीचा समावेश आहे. केंद्र सरकारनं डीएपीच्या गोणीला आता ७०० ऐवजी १२०० रुपये अनुदान जाहिर केलं आहे. त्यामुळं डीएपीचं पोतं आता २४०० (वाढीव किंमत) रुपयांऐवजी पुर्ववत १२०० रुपयांनाच मिळणार आहे. 

हे देखिल पहा

केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात रासायनिकखतांचं Fetrtilizers उत्पादन करण्यासाठी कच्चा माल परदेशातून आयात Import  करावा लागतो. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं कंपन्यांच्या दबावापोटी सरकारनं खतांच्या किमती वाढवल्या होत्या. पण गेल्या काही दिवसात देशभरातून रासायनिक खतांच्या दरवाढीबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री खा. शरद पवार यांनीदेखील कालच रासायनिक खत मंत्री सदानंद गौडा यांना खतांच्या किमतीत वाढ न करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर देशभरातल्या शेतकरी संघटनांनी देखील खतांच्या भाववाढीला विरोध केला होता. परिणामी आज झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय जाहिर केला. Farmers to get fertilizers by old rates decided by Narendra Modi

शेतकऱ्यांनी आता रासायनिक खतं विक्रेत्यांकडून जादा दरानं खतं विकत घेण्याऐवजी त्यांना जुन्या दरानंच खतं विकण्याचा आग्रह धरणं गरजेचं आहे. अनेकदा विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. ऐन खरीपाच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या या निर्णयानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर, रासायनिक खत मंत्री सदानंद गौडा आणि संबंधित विभागांचे सचिव उपस्थित होते
Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com