कृषी विभागाचा सल्ला; शेतकऱ्यांनो खतांचे भाव वाढणार, खतांचा साठा भरून ठेवा!
कृषी विभागाचा सल्ला; शेतकऱ्यांनो खतांचे भाव वाढणार, खतांचा साठा भरून ठेवा!SaamTvNews

कृषी विभागाचा सल्ला; शेतकऱ्यांनो खतांचे भाव वाढणार, खतांचा साठा भरून ठेवा!

रशिया - युक्रेन युद्धामुळे रासायनिक खते महागणार असून खतटंचाई सुद्धा निर्माण होऊ शकते.
Published on

अकोला : खरीप हंगामात खताचे भाव गगनाला भिडणार असल्याने खतांचा साठा भरून ठेवा असा अजब सल्ला कृषी विभागाने दिलाय. रशिया - युक्रेन युद्धामुळे रासायनिक खते (Chemical Fertilizers) महागणार असून खतटंचाई सुद्धा निर्माण होऊ शकते. त्यामुळे येणाऱ्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी आणि कृषी केंद्रांनी खते आतापासूनच घेऊन ठेवण्याचा सल्ला कृषी विभागाने दिलाय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडलीय.

हे देखील पहा :

दरम्यान रशिया (Russia) खतांचा एक मोठा निर्यातदार देश आहे. दरवर्षी देशात पाच कोटी टन विविध प्रकारच्या खतांची निर्मिती करण्यात येते. खत निर्मितीमध्ये जगात रशियाचा तेरा टक्के वाटा आहे. रशियामध्ये सिंथेटिक फर्टिलायझर आणि युरियाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. अशा स्थितीमध्ये जर रशियावरील निर्बंध कायम राहिल्यास जगात खतांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. भारतात देखील ऐन पेरणीच्या हंगामात खते महागण्याची शक्यता आहे. खते महाग झाल्यास त्याचा मोठा आर्थिक फटका हा शेतकरी (Farmers) वर्गाला बसू शकतो.

कृषी विभागाचा सल्ला; शेतकऱ्यांनो खतांचे भाव वाढणार, खतांचा साठा भरून ठेवा!
करूणा मुंडेंच्या 'शिवशक्ती' पक्षाची राज्यातील पहिली शाखा नगरमध्ये (VIDEO)

त्यामुळे आतापासूनच खताचा साठा भरून ठेवा असा अजब सल्लाच कृषी विभागाने (Agriculture Departmet) शेतकऱ्यांना दिलाय. जिल्ह्यात सध्या खताचा मुबलक साठा असल्याने खते विकत घेऊन ठेवण्याचा सल्ला देण्यात आलाय. दरम्यान आतापासून खते भरून ठेवल्यास ते खराब होण्याची शक्यता ही जाणकारांनी व्यक्त केलीय. दरम्यान कृषी विभागाच्या या अजब सल्ल्याने शेतकऱ्यांच्या मात्र चिंतेत भर पडलीय.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com