Pandharpur News : ऊसदराचा उडाला भडका; मध्यरात्रीनंतर आंदाेलन झालं तीव्र, पहाटे तर...

अनेक भागातील शेतक-यांनी ऊस दराच्या मागणीसाठी ऊस तोडी बंद केल्या.
pandharpur
pandharpursaam tv

Pandharpur News : ऊसदराच्या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. मंगळवेढा आणि पंढरपूर येथे रात्री ऊस दर संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली आहे. आज पहाटे देखील अनेक ट्रॅक्टर रस्त्यावरच थांबविण्यात आले आहेत. (Pandharpur Latest Marathi News)

बुधवारी रात्री वाखरी येथे आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. यामध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या चार ट्रॅक्टरचे टायर फोडले‌. त्यानंतर गुरुवारी रात्री मंगळवेढा आणि पंढरपूर ऊस वाहतूक रोखली. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी ऊसाच्या वाहनांची हवा सोडून आंदोलन केले. (Breaking Marathi News)

pandharpur
Satara Breaking News : काेयना परिसरात भूकंपाचा धक्का

यंदाच्या हंगामात ऊसाला पहिली उचल अडीच हजार रुपये जाहिर करावी अशी मागणी ऊसदर संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी आंदोलन पुकारण्यात आले आहे. काल पासून ऊसदर आंदोलन तीव्र झाले आहे. अनेक भागातील शेतक-यांनी (farmers) ऊसदराच्या मागणीसाठी ऊस तोडी बंद केल्या आहेत तर काही ठिकाणी ऊस वाहतूक रोखली जाते आहे. (Breaking Marathi News)

pandharpur
Jamb Samarth News : जांब समर्थ मूर्ती चोरी प्रकरणी एलसीबीने कर्नाटकातून दाेघांना घेतलं ताब्यात

या आंदोलनामुळे ऊस तोडणीची कामे पन्नास टक्के बंद झाल्याने कारखान्याच्या गाळपावर परिणाम झाला आहे. आंदोलना संदर्भात ऊसदर संघर्ष समिती आणि साखर कारखानदार यांची लवकरच बैठक घेतली जाईल असे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर (milind shambharkar) यांनी सांगितले. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

pandharpur
Khamgoan : खामगावातील भीषण आगीत आठ दुकाने जळून खाक; अकोला, शेगावची फायर ब्रिगेड यंत्रणा धावली मदतीला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com