Maval: पुनर्वसनाच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक; एमआयडीसीचा पाणीपुरवठा केला शेतकऱ्यांनी बंद...

Farmers Rehabilitation News: राज्य सरकार सतत दुर्लक्ष करत असल्याने शेटेवाडी मधील शेतकरी आक्रमक होऊन त्यांनी थेट एमआयडीसीमधील (MIDC) कंपन्यांना होणारा पाणीपुरवठा (Water Supply) बंद केला.
मावळातील शेटेवाडीमधील शेतकरी आक्रमक
मावळातील शेटेवाडीमधील शेतकरी आक्रमकदिलीप कांबळे
Published On

पुणे: मावळमधील आंध्र धरण प्रकल्पाला 1998 मध्ये मंजुरी मिळाली. परिणामी 13 गावातील शेतकऱ्यांची 600 हेक्टर जमीन पाण्याखाली गेली व त्यामध्ये शिरे, शेटेवाडी (shire shetewadi) या गावातील शेतकऱ्यांच्याही शेतजमीनी पाण्याखाली गेल्या. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधन न राहिल्याने शेतकरी गावठाण पुनर्वसन (Rehabilitation) व्हावे म्हणून मागणी करत आहे. परंतु राज्य सरकार सतत दुर्लक्ष करत असल्याने शेटेवाडी मधील शेतकरी आक्रमक होऊन त्यांनी थेट एमआयडीसीमधील (MIDC) कंपन्यांना होणारा पाणीपुरवठा (Water Supply) बंद केला. (Farmers aggressive in demanding rehabilitation; MIDC's water supply cut by farmers)

हे देखील पहा -

शेतकऱ्यांच्या (Farmers) जमिनी घेऊन त्या जागेवर कंपन्या उभ्या केल्या परंतु शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी दिली जात नाही आणि जमिनीचा मोबदला देखील शेतकऱ्यांना दिला जात नसल्याने मावळमधील (Maval) हे शेतकरी आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत तळेगाव एमआयडीसीमधील कंपन्यांना हा पाणीपुरवठा सुरू करणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com