Akola APMC Market : अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला मिळाला विक्रमी दर

आता सोयाबीनची खरेदी सुरळीत सुरु झाली आहे.
farmer gets highest rate for soyabean in akola apmc
farmer gets highest rate for soyabean in akola apmcsaam tv

- हर्षदा सोनोने

Akola News :

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये अडत्या व्यापारी मंडळाने शेतकऱ्यांना दीपावली (Diwali Festival) पूजनाचे मोठे गिफ्ट दिले. येथे विक्रमी दरात सोयाबीनची खरेदी केल्याने शेतक-यांमध्ये आनंददायी वातावरण हाेते. (Maharashtra News)

farmer gets highest rate for soyabean in akola apmc
Manoj Jarange Patil Sabha In Satara: जरांगे-पाटलांच्या सभेला उदयनराजेंसह शिवेंद्रराजेंचा विराेध? मराठ्यांनी स्पष्टच सांगितलं

दीपावली निमित्त आयोजित शेतमाल खरेदीच्या शुभारंभ गुरुवारी करण्यात आला. यामध्ये जाहीर लिलावात सोयाबीनची 5 हजार 52 रुपये प्रतिक्विंटलवर बोली लावण्यात आली. सोयाबीनला मिळालेला हा दर (akola apmc soyabean rate) यंदाच्या हंगामातील दराचा विक्रम मोडणारा ठरला.

दीपावलीनंतरच्या शेतमाल खरेदीचा आरंभ उच्चांकी दराने झाल्यामुळे आता अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनची चमक वाढतीच राहून आज 5250 चा भाव सोयाबीनला मिळाला. आगामी काळात अजून भाव वाढण्याची शक्यता आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आता सोयाबीनची खरेदी सुरळीत झाली असून शेतकऱ्यांनी एपीएमसीला सोयाबीन घेऊन येण्याचेही आवाहन ही यावेळी करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com