लातूर : लातुर तालुक्यामधील गादवड या गावात एका अल्पभूधारक शेतकरी जोडप्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गादवड शिवारामध्ये लिंबाच्या झाडाला दोघांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. एकाच दिवशी पती- पत्नीने अशाप्रकारे आयुष्याचा शेवट केल्यामुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शनिवारी मुरुड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हे देखील पहा-
या घटनेचा अधिक तपास लातूर पोलीस करत आहेत. बळीराम रावसाहेब कदम (वय-५०) आणि वैशाली ऊर्फ मंगलबाई बळीराम कदम असे आत्महत्या केलेल्या शेतकरी दाम्पत्याचे नाव आहेत. ते लातूर तालुक्यातील गादवड गावामधील रहिवासी आहे. संबंधित शेतकरी जोडप्याने शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास सारसा रस्त्यावर असलेल्या त्यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला सुताच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेत तांदुळजा या ठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनाकरिता पाठवले आहेत. शवविच्छेदन झाल्यानंतर पोलिसांनी दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देणार आहेत. संबंधित शेतकरी जोडप्याने नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली. याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
मुरुड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे. नातेवाईक आणि आसपासच्या लोकांची चौकशी करत पोलीस नेमक्या कारणाचा शोध घेत आहेत. या घटनेचा तपास लातूर पोलीस करत आहेत. मृत शेतकरी दाम्पत्याला २ एकर शेतजमीन होती. त्यांचा स्वभाव शांत आणि संयमी होता. ते सर्वांबरोबर मिळून मिसळून राहत असल्याचे, अशी माहिती आसपासच्या लोकांनी दिली आहे. अशा या मनमिळावू दाम्पत्याने असा अचानक आयुष्याचा शेवट केल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.