Sangli Turmeric News : सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती (sangli krushi utpanna bazar samiti) आवारात हळदीला प्रती क्विंटल 11 हजार 500 रुपये इतका दर मिळाला आहे. गुढी पाडव्याच्या (Gudi Padwa 2023) मुहूर्तावर सांगलीच्या (Sangli) मार्केट यार्डात हळद (turmeric) सौदे पार पडले. (Breaking Marathi News)
दरवर्षी गुढी पाडव्याच्या (gudi padwa latest news) दिवशी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीकडून हळदीचे सौदे काढले जातात. यामध्ये खुल्या पद्धतीने हळदीचे लिलाव केले जातात. आज पाडव्याच्या दिवशीही मार्केट कमिटी आवारात हळदीचे सौदे पार पडले.
सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली (sp basavaraj teli) यांच्या हस्ते सौद्याचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये कर्नाटकातील हळदीला उच्चांकी 11 हजार 500 इतका दर प्रति क्विंटलसाठी मिळाला. याचबरोबर साडेसहा हजारापासून ते 11 हजार 500 पर्यंत हळदीला आजच्या सौद्यामध्ये दर मिळाला आहे. यामुळे हळद उत्पादक शेतकरी समाधानी आहेत.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.