अठरा लाख शेतकऱ्यांना मिळाली जमिनीची आरोग्यपत्रिका

जमिनीची आरोग्य पत्रिका
जमिनीची आरोग्य पत्रिका
Published On

अहमदनगर : माती हे पिकांच्या वाढीसाठी अन्नद्रव्यांचा पुरवठा करणारे सजीव व नैसर्गिक माध्यम आहे. त्यामुळे मातीचे परीक्षण आवश्यक असून, यातून मिळालेल्या माहितीनुसार खते, बी-बियाणे, पिकांची वाढ, याचे संपूर्ण उत्तर शेतकऱ्यांना मिळते.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या पुढाकारातून मृदसर्वेक्षण व चाचणी विभागाने एक हजार ६०२ गावांत मातीपरीक्षण केले. यातून १८ लाख २२ हजार ६५५ शेतकऱ्यांना मृदा आरोग्यपत्रिका देण्यात आली.

जमिनीची आरोग्य पत्रिका
सत्तराव्या वर्षी मारहाण करून मुलगा-सुनेने घराबाहेर काढलं

खरीप व रब्बी हंगामात पेरणीपूर्व मातीपरीक्षण आवश्यक आहे. अनेक शेतकरी मातीपरीक्षणाकडे दुर्लक्ष करतात, तसेच एकाच वाणाचा पेरा करतात. यातून ना चांगले उत्पन्न निघते, ना भाव मिळतो. परिणामी, शेतीव्यवसाय तोट्यात जातो. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे, यासाठी कृषी विभागाच्या पुढाकारातून मातीपरीक्षणाची मोहीम सुरू आहे. यात एक हजार ६०२ गावांमध्ये परीक्षणासाठी मातीचे नमुने घेण्यात आले होते.

मातीपरीक्षणानंतर आवश्यक असलेले घटक शेतकऱ्यांनी द्यावेत, यासाठी सल्ला दिला जातो. आरोग्यपत्रिकेच्या माध्यमातून जमिनीचा पोत काढला जात असून, कोणत्या वाणाची पेरणी, कोणती खते द्यावीत, याची माहिती दिली जात असल्याने, शेतकऱ्यांची सोय झाली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून आर्थिक सुबत्ता वाढविण्यासाठी मृदा तपासणीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. अन्नद्रव्याच्या कमतरतेनुसार खतांच्या संतुलित व कार्यक्षम वापरास प्रोत्साहन दिले जात आहे.

मृदातपासणी जिल्हा दृष्टिक्षेपात...

● अकोले................११५

● संगमनेर.................७९

● कोपरगाव..............१२१

● राहाता..................१९१

● राहुरी......................६०

● श्रीरामपूर...............११३

● नेवासे...................१२०

● शेवगाव.................१३७

● पाथर्डी....................५६

● जामखेड..................९६

● कर्जत...................१३४

● श्रीगोंदे............... .११९

● पारनेर..................१७१

● नगर....................९०

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com