अहमदनगर : वृद्धापकाळात बहुतांशी लोकांना लेक-सुनांचा त्रास सहन करावा लागतो. काही तर अडगळ म्हणून अनाथ आश्रमात टाकतात. काही नागरिक मात्र मुलांना धडा शिकवण्यासाठी कोर्टाची पायरी चढतात. नेवासा तालुक्यातील सोनई येथेही असेच घडले.
स्वतःच्या मुलानेच जमीन हडप केल्याने वडिलांनी त्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून लक्ष वेधले आहे.
तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, मला तीन मुले आहेत, त्यांना सारख्या प्रमाणात जमीन वाटून दिली. माझ्या उदरनिर्वाहासाठीही काही जमीन ठेवली होती. ती जमीन मलाच मिळावी यासाठी थोरल्या मुलाने तगादा लावला होता. ती न दिल्याने मुलगा-सून व नातवाने गुराढोराप्रमाणे मला मारहाण केली. Filed a case against the son who beat the father abn79
ज्ञानदेव रभाजी दहातोंडे (वय ७०) असे या अभागी पित्याचे नाव आहे. त्यांनी स्वतःसाठी ठेवलेल्या जमिनीवर थोरल्या मुलाचा डोळा होता. त्याने परस्पर खोटी सही करून हडप केली. याबाबत महसूल विभागाकडे त्यांनी तक्रार केली. यानंतर दहातोंडे यांना गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. सोनई पोलिसांनी फिर्याद घेण्याची टाळाटाळ केली. जिल्हा पोलिस अधीक्षकांना तक्रार अर्ज दिल्यानंतर सोनई पोलिसांनी मोठा मुलगा प्रदीप, सून शारदा व नातू अनिकेत यांच्याविरुद्ध जूनमध्ये अदखलपात्र नोंद केली आहे. Filed a case against the son who beat the father abn79
दहातोंडे यांनी मोठा मुलगा, सून व नातवापासून जीवितास धोका असल्याचे निवेदन मुख्यमंत्री व जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले असून, माझ्या नावावर असलेली जमीन खोट्या सह्यांनी हडप करणे व जीवितास धोका म्हणून कुठलीही पूर्वकल्पना न देता सोनई पोलिस ठाण्यासमोर आत्मदहन करणार असल्याचे त्यांनी त्यात म्हटले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.