Dhule News : सततच्या नापिकीतून तरुण शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल

Dhule News : शेतात रोगार या कीटकनाशकाची बाटली पडलेली आढळली. मयूर यांनी विषारी रोगार औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याचे त्यांच्या नातलगांनी सांगितले
Dhule News
Dhule NewsSaam tv
Published On

न्याहळोद (धुळे) : पावसाचा लहरीपणा व अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे (Dhule) उत्पादन घातले आहे. सततच्या नापिकीमुळे बिलाडी (ता. धुळे) येथील तरुण शेतकऱ्याने (Farmer) आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.  (Tajya Batmya)

Dhule News
Anganwadi Sevika Strike: अंगणवाडी सेविका बेमुदत संपावर; बालके पोषण आहारापासून वंचित

मयूर प्रकाश पाटील (वय २३) असे शेतकऱ्याचे नाव आहे. मयूर नियमितप्रमाणे शेतात गेले होते. मात्र, ते घरी न आल्याने घरच्यांनी तपास सुरू केला. नीलेश पाटील, नितीन पाटील, मनोज शिंदे आदी त्यांना शोधत शेतात गेले असता त्यांना तेथे मयूर मृतावस्थेत पडलेले दिसून आले. त्यांनी तत्काळ धुळे येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयूर यांना तपासून मृत घोषित केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dhule News
Unseasonal Rain : मध्यरात्री भंडारा जिल्ह्यात जोरदार पाऊस; शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट

फवारणी औषधी केले प्राशन 

शेतात रोगार या कीटकनाशकाची बाटली पडलेली आढळली. मयूर यांनी विषारी रोगार औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याचे त्यांच्या नातलगांनी सांगितले. घरची परिस्थिती हलाखीची असून, यंदा शेतीतून उत्पन्न येईल या आशेवर असताना तेही आले नाही. दुसरीकडे शेतीसाठी घेतलेले खासगी व बँकेचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत मयूर असायचे. त्यातूनच आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या मागे वडील प्रकाश हिरामण पाटील, भाऊ प्रमोद पाटील, बहीण राणी पाटील असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com