Farming: सेंद्रिय पद्धतीचा वापर करत लाखोंचे उत्पन्न

सेंद्रिय पद्धतीचा वापर करत लाखोंचे उत्पन्न
organic farming
organic farmingsaam tv
Published On

धुळे : साक्री तालुक्यातील जैताने येथील पदवीधर असलेले प्रगतशील शेतकरी दुल्लभ जाधव यांनी तीन वर्षांपासून सेंद्रिय शेतीच्या (Organic Farming) माध्यमातून प्रतिकूल वातावरणात देखील लाखो रुपयांचा नफा कमवला आहे. (dhule news millions earned farmer using organic methods)

organic farming
खर्चासाठी मागितले पैसे..संपामुळे पगार नसल्‍याचे सांगून बाप आंदोलनात अन्‌ मुलाने घेतला गळफास

सेंद्रिय खतासाठी जाधव यांनी आपल्या शेतातच जवळपास २५ जनावर पाळली असून त्यांच्यापासून निघणाऱ्या मलमुत्राचा सेंद्रिय खतासाठी उपयोग केला जातो. हेच सेंद्रिय खत आपल्या शेतात असलेल्या पिकावर त्याचा वापर केला जातो. दुल्लभ जाधव (farmer) हे १२ एकर क्षेत्रात शेवगा, कांदा (Onion), खपली गहू तसेच सर्व प्रकारच्या पालेभाज्या त्याचबरोबर जनावरांचा चारा हे सर्व कुठल्याही प्रकारचे रासायनिक खत न वापरता फक्त आपल्या शेतात पाळलेल्या पाळीव गाईंच्या मलमूत्रापासून तयार झालेल्या सेंद्रिय खताची फवारणी करूनच शेती करतात.

एकरी दहा क्विंटल कापूस

सेंद्रिय खताचा वापर करून दुल्लभ जाधव यांनी आपल्या शेतात नुकतच एकरी दहा क्विंटल कापूस त्यांच्या शेतात पीकवला आहे. जीवामृत, दशपर्णी, अर्क याचा वापर पीक घेण्यासाठी जाधव करतात. जाधव यांनी आपल्या शेतातच मत्स्य पालनाचा देखील उपक्रम राबविला असून त्या माध्यमातून देखील त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com